कोरोनाच्या अनुषंगाने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे;जिल्हाधिकारी राम

613

नवीन इमारतीच्या कामांची पहाणी

पुणे, दि.8 : जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना संशयीत व बाधीत रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.

कोरोना विषाणू संशयित व बाधित रुग्णांसाठी ससून हॉस्पिटलच्या अकरा मजली नवीन इमारतीत विलगीकरण कक्ष व अतिदक्षता विभाग तयार करण्यात येत आहे. या तयारीबाबतच्या कामांची पहाणी जिल्हाधिकारी श्री.राम यांनी केली. यावेळी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ.अजय चंदनवाले, सहायक प्राध्यापक डॉ. हरिष टाटीया, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.राम यांनी या इमारतीतील फ्ल्यू ओपीडी, विलगीकरण कक्ष, अतिदक्षता विभागात सुरु असलेल्या कामांची पहाणी करुन उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अतिदक्षता विभागात व्हेंन्टीलेटरसह आवश्यक त्या सुविधा गतीने देण्यात याव्यात, असे सांगून इमारतीच्या इतर अनुषंगीक बाबींच्या उपलब्धतेबाबत त्यांनी सूचना केल्या. कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीस सेवा सुविधा, व्हेंन्टीलेटर, पीपीई कीट आदी बाबींचा त्यांनी आढावा घेतला.

000000