तहसीलदारांनी केली आळंदी निवारा केंद्राची पाहणी ; कोरोना रोखण्याचे उपाय योजना  

570

अर्जुन मेदनकर, आळंदी 

येथील गरजू,बेघर व कामगार तसेच स्थलांतरितांच्या निवाऱ्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थे अंतर्गत आळंदी निवारा केंद्राची पाहणी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी करून मार्गदर्शक सूचनादेश दिले.
 कोरोनाचे महामारीचे संकट दूर करण्याचे उपाय योजने साठी आळंदी नगरपरिषदेने आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक १ व श्री ज्ञानेश्वर विद्यालयात निवारा केंद्र तयार केले आहे. या ठिकाणी सुमारे २६० वर लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात जेवण,नाश्टा,चहा तसेच निवारादि सोय करण्यात आली आहे. या व्यवस्थेची पाहणी खेड तहसीलदार आमले यांनी केली. यावेळी मंडलाधिकारी चेतन चासकर,आळंदी तलाठी विकास नरवडे,संतोष वीर,संजय चव्हाण आदी उपस्थित होते. या ठिकाणी निवारा ग्रस्ताना उत्तम प्रकारचे भोजन दिले जात आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय आळंदी पंचक्रोशीतील सेवाभावी संस्थांचे वतीने देखील अन्नदान वाटप केले जात आहे.या निवारा केंद्राची पाहणीकरताना स्थलांतरितांनी निवारा केंद्रात सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्याची गरज व्यक्त केली.प्रत्येकाने लॉक डाउन च्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. या नंतर तहसीलदार आमले यांनी आळंदी नगरपरिषदेत मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी भेट घेऊन येथील नियोजन कार्यवाही व परिस्थितीची माहिती घेत संवाद साधला.
आळंदीत भाजी विक्रेते यांच्यावर कारवाई
आळंदी नगरपरिषदेने आळंदीत विविध ठिकाणी भाजी विक्रीची व्यवस्था करून दिली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते व्यवसाय करीत असून लॉक डाउनच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून आल्याने भाजी विक्रते यांचे वजन काटे कर निरीक्षक रामराव खरात,रमेश थोरात यांचे पथकाने जप्त केले.अत्यावश्यक सेवेच्या दुकानांवर वेळेची मर्यादा आवडेश दिले असून काही नागरिक किराणा,भाजीपाला घेण्याचे उद्धेशाने अनेक वेळा तसेच वारंवार विनाकारण रस्त्यावर येत असल्याने आळंदी पोलीस व नगरपरिषद प्रशासनाने कारवाईचा इशारा देत अनेकांवर कारवाई केली आहे.कोरोनाचे महासंकट रोखण्यासाठी आळंदी देखील पूर्णपणे तीन दिवस सलग सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी बंद ठेवण्याची गरज असल्याचे निवेदन आळंदी नगरपरिषदेचे गटनेते पांडुरंग वहिले यांनी मुख्याधिकारी समीर भूमकर यांना देऊन लक्ष वेधले आहे. आळंदीतील नागरिकांची सुरक्षितता जोपासण्यास प्रशासनाने यासाठी निर्णय घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी आळंदीत जोर धरत आहे. यासाठी खेडचे प्रांत संजय तेली यांना देखील कालविणेत आले आहे.


आळंदी गावठाणातील पिण्याचे पाणी उच्च दाबाणे येणार


ळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ६ मध्ये उच्च दाबाने पिंण्याचे पाणी येत नसल्याने नागरिकांची नाराजी वाढत होती. यावर उपाय योजना करीत नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचे दत्तात्रय सोनटक्के यांनी हजेरी मारुती चौकातील पाणी पुरवठा मालिकांची देखभाल दुरुस्ती केली.यात पाण्याचे नलिकां मध्ये अडकलेल्या वस्तू प्लायवूड,सिमेंट वीट बाहेर काढून पाण्याचे प्रवाहातील अडचणी दूर केल्याने प्रभाग क्रमांक सहा मध्ये उच्च दाबाने पाणी पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.