करोनाला पराभूत करण्याची शपथ  घेत महामानवाला आळंदीत अभिवादन

535

अर्जुन मेदनकर,आळंदी 

: सोशल सिस्टन्सिंग पाळून करोनाला पराभूत करण्याची शपथ  घेत, महामानवाला आळंदीत मंगळवारी (दि.१४) अभिवादन करण्यात आले. आंबेडकर जयंती निमित्त सामाजिक उपक्रम  देण्यात आला होता.करोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत साध्या पद्धतीने यंदाची आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

आळंदी नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत  नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना मास्क व हातमोज्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी समीर भूमकर, कर निरीक्षक आर.टी. खरात, कर संकलन विभागाचे रमेश थोरात, आरोग्य निरीक्षक शीतल जाधव, मुकादम मालन पाटोळे, कर्मचारी मल्हारी बोरगे, सागर भोसले, भारतीय बौद्ध महासभेचे आळंदी शहराध्यक्ष तुषार रंधवे, राहुल नरवडे आदी उपस्थित होते.

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बुध्द वंदना व भीमस्तुती घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी समीर भूमकर, आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, भारतीय बौद्ध महासभेच्या आळंदी शहर शाखेचे  पदाधिकारी व सिद्धार्थ ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

भारतीय बौध्द महासभेच्या आळंदी शहर शाखेच्या वतीने महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच करोनाला पराभूत करण्याची शपथ देत, सर्व पदाधिकाऱ्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील अशाच एका जातीवादाच्या करोनाला पराभूत केले आहे. आता आपणही सोशल डिस्टन्सिंग पाळून करोना विषाणूला हरवून या महामानवाला  अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्याचे आवाहन शहराध्यक्ष तुषार रंधवे यांनी सोशल मीडियावर केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी-मरकळ रस्त्यावरील चऱ्होली बुद्रुकमधील भीम आर्मी तनिश सृष्टी परिवाराच्या वतीने जयंती निमीत्त आयोजित केले जाणारे सामाजिक उपक्रम रद्द करण्यात आले .करोनामुळे या सोसायटीतील बौद्ध बांधवांनी घरातील भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे घरीच पूजन करत भीमजयंती साजरी केली, अशी माहिती संस्थेचे पदाधिकारी हर्ष कुंभारे  व शैलेश हाते यांनी दिली. 

फोटोओळ-आळंदी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना मास्क व हातमोजे वाटप करण्यात आले.

 

आळंदी : कोरोना प्रार्दुवभाव रोखण्यास आळंदी दोन दिवस बंदचा निर्णय घेण्यात आला.या अंतर्गत पहील्षा दिवशी सोमवारी सर्व आस्थापना बंद मध्ये सहभागी होत बंदला प्रतिसाद दिला.यासाठी आळदी मुख्याधिकारी समिर भुमकर व वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी आवाहन केले होते.