कोंढवा खुर्द गावाची श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा रद्द

1320

कोंढवा प्रतिनिधी,

सालाबादप्रमाणे कोंढवा खुर्द गावठाण मधील श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा कोव्हीड19 (कोरोना) व्हायरस मुळे रद्द करण्यात आल्याची माहिती कोंढवा खुर्द ग्रामस्थांनी दिली आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ,शांततेत महाराजांची यात्रा साजरी केली जाते पण यंदा कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला असल्याने आणि कोंढवा परिसरात कर्फ्यू तसेच संचारबंदी, जमावबंदी असल्याने हा निर्णय घेतल्याचे देवस्थान समितीने कळविले आहे.

  लॉकडाऊन ,संचारबंदी,जमावबंदी असल्याने तसेच यात्रा रद्द केल्याने श्री नाथसाहेबांचे मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे तरी कोणीही घराबाहेर न पडता दर्शनासाठी येऊ नये अशी विंनती देखील मंदिर समितीने ग्रामस्थ तसेच नागरिकांना एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.