आळंदीत दोन दिवसांचा जनता कर्फ्यु यशस्वी

759

अर्जुन मेदनकर,आळंदी 

तिर्थक्षेत्र आळंदीत सोमवार व मंगळवार या दिवशी जनता कर्फ्यु आळंदी नगरपरीषद व पोलीस प्रशासनासूने जाहीर केला होता . या जनता कर्फ्युला नागरीकांनी प्रतिसाद दिला असुन आता आळंदीला जोडणारे रस्ते व नदी वरील पुल देखील संरक्षक बरीकेट्स लावुन वापरास बंद करण्यात आहे आहेत. सोमवार (दि.२० )व मंगळवार (दि२१ ) या दिवशी आळंदीत दोन दिवसांचा जनता कर्फ्युला सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यातुन केवळ रुग्णालये व मेडीकल देकाणे वगळण्यात आली होती.अशी माहीती मुख्याधिकारी समिर भुमकर व वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी दिली.
जनता कर्फ्यु काळात आळंदी परीसर संपुर्ण पणे लाँंकडाऊन बंद ठेवण्यात आला.या काळात नागरीकांनी घरी राहुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यापुर्वी १६ व १७ एप्रिल ला आळंदी बंद काळात सर्वानी सहकार्य केले .मुख्याधिकारी सनिर भुमकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी आळंदीकरांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत संवाद साधला होता. आळंदी लगतचे महापालीका हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी चे उपाय योजना आळंदीतही केल्या जात आहेत.याचाच भाग म्हणुन आळंदी शहरात रस्ते वाहतुक सेवेस मर्यादा इणल्या आहेत. २० व २१ एप्रिल ला दोन दिवस पुर्ण पणे जनता कर्फ्यु यशस्वी ठरला.यात आळदी शहर बंद ठेवले होते.नागरीकांनी यापुर्वी जसे प्रशासनास सहकार्य केले आहे असेच सहकार्य पुढे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


सर्व प्रकारचे नियम नागरीकांनी पाळावेत.यात सोशल डिस्टंसिंग ,गर्दी न करता दुकानांतुन अत्यावश्यक वस्तुंची खरेदी करावी .मात्र बंदचे काळात विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसल्यास कारवाई केली जात आहे. आळंदीत दुचाकीं वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी सांगितले.
सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवशी आळंदीतील सर्व व्यवहार दुकाने बंद ठेवल्याने प्रशासनाचे उपाययोजनेस यश आले. मुख्चाधिकारी समिर भुमकर यांनी सांगितले आहे. अत्यावश्यक साहित्य, किराणामाल, भाजीपाला ,फळे दुकानांचे समोर गर्दी न करता खरेदी करुन बंद च्या काळात घरी सुरक्षित रहाण्याचे आवाहन मुख्याधिकारी समिर भुमकर व वरीष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी केले आहे.
कोणीही घराबाहेर विना कारण फिरु नये.अन्यथा कारवाई केली जाईल .नगरपरीषद व पोलीस प्रशासनास सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन आळंदी नगरपरीषद मुख्याधिकारी समिर भुमकर व आळंदी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर यांनी आळंदीतील नागरीकांना केलेआहे.