आळंदीत भैरवनाथ पतसंस्थे तर्फे स्वयंचलित निर्जंतुकीकरण कक्षाचे लोकार्पण

1236

अर्जुन मेदनकर,आळंदी

: येथील श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आळंदीत सर्व नागरिकांसाठी वापरण्यास सोयीस्कर स्वयंचलित निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला. या कक्षाचे लोकार्पण करण्यात आले.  
 शिवसेना शिरूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकार्‍यांशी गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला होता. यावेळी पतसंस्थेचे संचालक माजी उपाध्यक्ष रामशेठ गावडे यांनी आळंदीत निर्जंतुकीकरण कक्षाची मागणी केली होती. त्यानुसार या भागात भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला असून एखाद्या व्यक्तीने या कक्षात प्रवेश केल्यानंतर स्वयंचलित पद्धतीने सदर व्यक्तीवर फवारणी होते. या निर्जंतुकीकरण कक्षाचे लोकार्पण आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, नगरपरिषद कर निरीक्षक रामराव खरात, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर,स्वकाम सेवेचे संस्थापक डॉ. सारंग जोशी, विभाग प्रमुख उपसरपंच अमोल विरकर,सुरेश नाना झोंबाडे, प्रसाद दिंडाळ, सुनील थोरवे, शंकर घेनंद, गणेश शेळके,भैरवनाथ पतसंस्थेचे स्वप्नील एरंडे, समीर घुंडरे, राखी पारेख, अश्विनी वट्टमवार यांचे उपस्थितीत झ\ले. यावेळी परिसरातील नागरिकांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला. या उपक्रमाचे कौतुक केले. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यास सर्वांनी सहकार्य करा : उमरगेकर

आळंदी नगरपरीषदेच्या आरोग्य विभागाचे वतीने कोरोना संसर्ग होवु नये यासाठी शहरात विशेष काळजी घेतली जात आहे. नागरीकांची अत्यावश्यक सेवा मिळण्यास गैरसोय होवू नये यासाठी सूचनां देण्यात आल्या आहेत. नागरीकांनी देखील आपआपल्या घरी सुरक्षित राहण्याचे आदेशाचे पालन करून प्रशासनास साथ देण्याची गरज असल्याचे आळंदी नगरपरीषद नगराध्यक्षा वैंजयंता उमरगेकर यांनी आवाहन केले आहे.

 आळंदी नगपरिषदेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी नागरी सेवा सुविधा देण्यासह किराणा माल,मेडिकल, भाजी मंडईत भाजी खरेदी प्रसंगी नागरिकांनी सोशल डिस्टंसिग पाळण्यास परिषदेच्या वतीने तसेच पोलीस प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे. सॅनिटायजेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिका कार्यालयात येताना याचा वापर करण्याचे आवाहन नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी केले.

 नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांच्या सोयी साठी शहरात भाजी विक्रेते यांची व्यवस्था केली असून याठिकाणी सामाजिक अंतर कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आळंदीतील कर निरीक्षक रामराव खरात यांचे नियंत्रणात व्यवस्थेची पाहणी करीत नागरिकांसह विक्रेते यानां करण्यात आले आहे.

 

अन्नदान सेवा सर्मपण करताना मुख्याधिकारी समिर भुमकर