भुकेलेल्यांना अन्न ..हेच आमचे ध्येय …संकल्प एक लाख नागरिकांना अन्नपूरवठ्याचा

1337

अनिल चौधरी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ठीकठीकाणच्या मजुरांना तसेच नागरिकाना मदत करण्यासाठी सर्वच सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे , पण विशेष कौतुक करायचे असेल तर कोंढवा येथील  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या पक्षाचे नगरसेवक साईनाथ बाबर आणि त्यांच्या मित्र परिवाराचे…. त्यांनी एक लाख लोकांना दररोज ताजे स्वच्छ आणि सकस तसेच पौष्टिक अन्नदान करण्याचा विशेष संकल्प केला आहे. त्यामुळे त्यांचे कोंढवा तसेच पुणे शहर परिसरात विशेष कौतुक होत आहे. ते स्वत: तसेच त्यांच्या पत्नी आरती बाबर, शेखर लोणकर, सतीश शिंदे, योगेश बाबर, भरत शिंदे, नितीन अवधूत, सुमित कटारिया, अमोल शिरस, इर्शाद शेख, हर्शल बाबर तसेच मनसेचे कार्यकर्ते त्यांना याकामी मदत करत आहेत.

     साईनाथ बाबर आणि त्यांच्या मित्र परिवाराने  लॉकडाऊनची सर्वात प्रथम घोषणा पंतप्रधान मोदी यांनी घोषणा करताच घरोघरी भाजीपाला मोफत देण्यास सुरुवात केली. यानंतर हातावर पोट असणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकाना एक महिना पुरेल एवढा किराणा माल देण्यास सुरवात केली. तर काही नागरिकांनी अन्नाचा पुरवठा करण्यास सांगितला. लगेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांस तसा निरोप देऊन एक लाख नागरिकाना मोफत घरपोच दोन्ही वेळा अन्न देण्याचा संकल्प केला. हे अन्नछत्र लॉकडाऊन संपेपर्यंत  अखंडपणे दोन्ही वेळा भोजन पुरविणार आहेत. घरपोच अन्नछत्र हि संकल्पना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाचा भाग असून गर्दी न होता भूकेल्य्या कुटुंबांपर्यंत आम्ही पोहोचणे हे आमचे ध्येय बनले असल्याचे साईनाथ बाबर यांनी सांगितले. त्यांनी आतापर्यंत 40 हजार नागरिकाना घरपोच  सकाळ संध्याकाळ असे दोन वेळेचे अन्नांची पाकिटे ते देत आहेत. दररोज 5 हजार नागरिकाना  सकाळ संध्याकाळ अन्नाचे मोफत घरपोच वाटप केले जाते. हे अन्न बनविताना विशेष खबरदारी घेतली जाते रोज अन्न बनविण्यापूर्वी सर्व भाग निर्जंतुक केला जातो तसेच अन्न सुरक्षेची सर्व काळजी घेऊन अन्नछत्र बनविले जाते. यासाठी पूजा कॅटेरिंगचे शेखर लोणकर यांनी आपले कर्मचारी याकामासाठी मोफत दिले असून ते यासाठी झटत आहेत. याकामी त्याना त्यांचा मित्र परिवार तसेच कार्यकर्त्यांची मोठी मदत होत आहे.