मुख्यमंत्री सहाय्यता निधीस कर्मचा-यांची अकरा हजार रुपये मदत

1205

अर्जुन मेदनकर,आळंदी

: येथील आळंदी नगरपरिषद कर्मचारी भागवत सोमवंशी यांनी कोरोना मुले देशात आलेले महासंकटावर मत करण्यासाठी राज्य शासनाचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अकरा हजार रुपयांची मदत देत क वर्ग  नगरपरिषद कर्मचा-यांमध्ये वेगळा ठसा उमटविला. सर्व सामान्य कुटुंबातील कामगार यांनी केलेली मदत लाख मोलाची असून इतर अधिकारी,कर्मचारी तसेच पदाधिकारी यांना प्रेरणादायी आहे. भागवत सोमवंशी हे जनजागृती साठी देखील नगरपरिषदेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. नागरीकांना ते नेहमी जनजागृतीचे आवाहन करताना दिसतात. आळंदीतील कार्तिकी यात्रा,आषाढी यात्रा तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण आई प्रसंगी त्यांचे आवाजातील ध्वनी मुद्रिका नागरिकांना ठीकठिकाणी ऐकण्यास मिळते. त्यांचे खणखणीत आवाजाने नागरिकांचे लक्ष देखील जनजागृती करताना वेधले जाते. आता नगरपरिषदेच्या माध्यमातून कोरोना संदर्भात जाहीर आवाहन करीत आहेत.
आळंदीत घर मालकाचा भाडे न घेण्याचा निर्णय  
राज्यात कोरोना प्रादुर्भाव असल्याने ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर झालेला आहे. यामुळे सर्व व्यवहार व कामकाज ठप्प आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना व आदेशांचे पालन करताना नागरिक दिसत आहेत. अनेक कामगार व मोलमजुरी करणारे बेघर तसेच भाडेकरू यांना दिलासा देण्यासाठी आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते दीपक काळे यांनी आपल्या इमारती मधील भाडेकरू यांचे पुढील दोन महिने भाडे न घेण्याचा निर्णय घेत इतर घरमालकांना आदर्श घालून दिला आहे. या निर्णयाचे आळंदीत स्वागत करण्यात आले असून इतर नागरिकांनि तसेच मालमत्ताधारकांनी आपापल्या इमारतीतील भाडेकरू यांचे दोन महिन्याचे भाडे न घेता दिलासा देण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे. सामाजिक कार्यकर्ते दिपक काळे अडचणीच्या काळात मदतीला तयार झाल्याने अडचणीच्या काळात मदतीला तयार झाल्याने त्यांचे माजी नगरसेवक दिनेश घुले याची अभिनंदन केले आहे. यामुळे आळंदी नगरपरिषदेनेही शहरातील मालमत्ताधारकांना कर आकारणीतून सूट देऊन ५० टक्के कर यावर्षी कमी घेण्यास ठराव मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी केली आहे.
आळंदीत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती आळंदी नगरपरिषदेत पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने साजरी झाली .आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते महात्मा बसवेश्वर यांचे प्रतिमा पूजन व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नगरपरिषद कामगार उपस्थित होते. कोरोना प्रादुर्भावाचे पार्श्‍वभूमीवर सर्व प्रकारच्या कार्यक्रमावर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. यामुळे महात्मा बसवेश्‍वर जयंती वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी आळंदीत आपल्या घरी राहून साजरी केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अनुक्रमे देशात व राज्यात लॉकडाऊन ची प्रथम घोषणा केली होती. यावर्षी आळंदीत अत्यंत साधे पणाने जयंती साजरी करण्यात आली.