आळंदीत १२५ गरीब कुटुंबांना किराणा किटची मदत एक हात मदतीचा ; कर्तव्य पुरतीचा

748

अर्जुन मेदनकर ,आळंदी 

आळंदी व पंचक्रोशीतील गावामध्ये गरजुं गरीब कुटुंबांना किराणा किटची मदत वाटप करीत एक हात गरजु गरीब कुटुंबां साठी मदतीचा हा उपक्रम आळंदी जनहित फाऊंडेशन च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी च्या भावनेने कर्तव्य म्हणून राबविण्यात आला. यात शेकडो गोर गरिबांना मदतीचे वाटप करण्यात आले. आळंदी व परीसरातील गरजु गरीब कुटुंबाना फाउंडेशन तर्फे प्रमुख चेअरमन राजेंद्र घुंडरे व कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे माध्यमातून मदतीचे वाटप करण्यात आले. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती संस्था यांनी निरपेक्ष भावनेने मदत करीत किराणा किट उपलब्द्ध करून दिले. यामध्ये गायत्री परिवार पुणे,रमेश गोडसे,विमा प्रतिनिधी बाळासाहेब कदम,राजे ग्रुप आळंदीचे विनोद पगडे,पिंपरी रोटरी क्लब च्या माजी अध्यक्षा वर्षा पांगारे,प्रल्हाद भालेकर,हनुमंतराव थोरवे आदींनी मदत उलब्ध्द करून देत सामाजिक कार्याला हातभार लावला. अन्न धान्य रुपी मदतीतून कर्तव्य भावनेने फाउंडेशनच्या माध्यमातून कार्य करण्यात आले. दानशूर व्यक्ती संस्थांचे योगदान मिळाल्याने त्यांचे सहकार्यातून 125 किराणा मालाचे किट मोफत तसेच अन्नदानासाठी मदतीचे वाटप  करण्यात आले आहे. आळंदी परिसरात एक हात समाजातील गरीब गरजू कुटुंबांचे मदतीसाठी हा उपक्रम यातून राबविण्यात आला.
 एक हात लाँकडाऊन मुळे बाधित गरजु , गरीब , कामगार, विस्थापित,बेघर यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासनाच्या विशेष सहकार्याने व मार्गदर्शनाने आळंदी जनहीत फाउंडेशनच्या मार्फत लॉक डाउन मध्ये अडकलेले कामगार,गरजू नागरिक,विस्थापित,बेघर कुटुंबांना तयार अन्न शिजवून कम्युनिटी किचनच्या माध्यमातून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय समाजातील दानशूर  व्यक्ती संस्था यांनी किराणा माल साहित्य ,मसाले,तेल कडधान्य, भाजीपाला  इतर मदत वस्तू रूपात देण्यास आवाहन करण्यात आले आहे. यासाठी दानशूर व्यक्तींना मदत करायची इच्छा असेल त्यांनी फाउंडेशन कडे तसेच आळंदी नगरपरिषदेच्या कार्यालयात सुरु केलेल्या फूड बँकेत साहित्य जमा करावे असे आवाहन करण्यात आले आहे