मांजरी खुर्द गाव कन्टेन्मेंट झोन ; गावातील चौकात स्मशानशांतता

635

अशोक आव्हाळे, मांजरी खुर्द , 

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हवेली तालुक्यातील २१ भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ( कन्टेन्मेंट झोन ) म्हणून जाहीर करण्यात आले आहेत . या आदेशाची अंमलबजावणी सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून सुरु करण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे . हवेली तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हवेली उपविभागीय कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे .
या २१ सुक्ष्म प्रतिबंध भागात मांजरी खुर्द गाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरवातीपासूनच गावात प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रशासनही याकडे गामभीर्याने पहात असून ग्रामस्थही त्यासाठी सहकार्य करत असल्याचे दिसून येत आहे. सोमवार पासून कन्टेन्मेंट झोन जाहीर केल्यानंतर गावतील नागरिक अधिकच सतर्क होवून काळजी घेत आहेत. गावतील सर्वच दुकाने बंद आहेत. शेतातील काम व्यतिरिक्त ग्रामस्थ घराबाहेर पडत नाहीत.त्यामुळे गावातील वार्डा-वार्डात जाणारे रस्ते आणि गावच्या मुख्य चौकात स्मशान शांतता पसरली आहे. घरात राहून योग्य काळजी घेणे
आवश्यक असल्याने नागरिक त्यासाठी आता जागरूक दिसत आहेत.
नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वच विभाग आणि प्रशासन आपल्या स्तरावर प्रयत्नशील आहे. परंतु नागरिक आज दाखवत असलेले पेशन्स असेच ठेवुन दिलेले नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास गावातील कोरोनाची साखळी तुटण्यास नक्कीच मदत होईल, त्यामुळे नागरिकांनी घरात राहुन स्वतः ची आणि परिवाराची पर्यायाने गावाची काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थ अशोकराव आव्हाळे यांनी केले आहे.