गोरगरीब नागरिकांना “अवर्स हैप्पीनेस फौंडेशन” तर्फे अन्नधान्याचे कीट वाटप

547

पुणे प्रतिनिधी,

कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेले दीड महिना लॉक डाऊन मध्ये असलेल्या गोरगरीब नागरिकांना  आणि रोजंदारीवरील कामगार व गरजू कुटुंबाना “अवर्स हैप्पीनेस फौंडेशन” च्या वतीने सुखा शिधा वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण भारतातच वाढत आहे त्यातच पुणे शहर आणि मुंबई ही महानगरेही रेड झोन मध्ये असल्याने येथील जनता गेले दीड महिना लॉकडाऊन मध्ये आहे, या लॉकडाऊन मध्ये प्रामुख्याने सुरक्षारक्षक, बांधकाम मजूर,  रिक्षाचालक,मोलकरिन,  रोजंदारीवरील कामगार यांचे हाल होत आहे. याची जाण ठेवून मुंढवा येथील गोरगरीब कष्टकऱ्याना, कामगारांना  “अवर्स हैप्पीनेस फौंडेशन “ च्यावतीने सुखा शिधा वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.या किट मध्ये तांदूळ, गहू, साखर,तूर डाळ,खाद्यतेल, चहा पावडर,मीठ इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

या कार्य करिता “अवर्स हैप्पीनेस फौंडेशन “ संचालिका सोनम गुप्ता, संचालक मनिष गुप्ता, संदीपदादा भंडारी, प्रकश बोलभट, देविकाताई चव्हाण, सौरभ भंडारी, डॉ.बळीराम ओव्हाळ तसेच याकमी “ग्रीन अव्हनी” यांचे विशेष सहकार्य मिळाले.

“अवर्स हैप्पीनेस फौंडेशन “ हि सामजिक संस्था असून हि संस्था फ्री एज्युकेशन, वृद्धाश्रमातील नागरिकांना मदत करत असतात. तसेच गरजू लोकांना मोफत जेवणाची सोय देखील ते करत असतात. स्कील डेवलोप्लोमेंट सारखे उप्रकम राबवून तरुणांना नोकरीचे साधने उपलब्ध करून देत असल्याची माहिती संचालिका सोनम गुप्ता यांनी यावेळी दिली.