आळंदी पंचक्रोशी दत्तक गावांत जिवनावश्यक वस्तुंचे वाटप

736

अर्जुन मेदनकर,आळंदी

येथील डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे च्या वतीने उन्नत भारत अभियानातंर्गत 5 गावे चऱ्होली खु , सोळू , वडगाव घे , कोयाळी, भोसे, दत्तक घेतली असून प्रत्येक गावात 40 या प्रमाणे 200 जीवनवश्यक किट गरजु कुटुंबांना वाटप करण्यात आले.
दत्तक गांव सोळू ग्रामपंचायत या ठिकाणी किट चे वाटप करून कोरोना विषयी जनजगृती करून मास्क वाटप केलेे तसेच ग्रामपंच्यात कर्मचार्यांना आशा वर्कर याना मास्क व सॅनिटायझर वाटप केले.
या वेळी सरपंच कल्याणी ठाकूर,उपसरपंच, इतर सदस्य ग्रामपंचायत मधील कर्मचारी व डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज चे डॉ अमिताभ बॅनर्जी विभाग प्रमुख कम्युनिटी मेडिसीन, उन्नत भारत अभियान समन्वयक, डॉ.श्यामकांत कुलकर्णी (मेडिकल ऑफिसर), डॉ योगेश कवाणे, जोसेफ चेरीयन (हेल्थ सुप्रिडेंट) ,लता खंदारे, प्रविण कोल्हे(वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते)संगीता ढवळे,कालिदास तापकीर , पंजाब वैरागड, रामदास भाकरे,अनंता शिंदे,तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या विविध वारकरी शिक्षण संस्थांसह वारकरी कुटुंबाना भाजीपाला वाटप

: येथील सदगुरु ह.भ.प. रामदास बाबा कबीर यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यतिथी निमित्त कळंब ग्रामस्थ ता.आंबेगाव यांच्या वतीने संपूर्ण भाजीपाला वाटप करण्यात आला आहे यावेळी संत कबीर महाराज मठाचे प्रमुख ह.भ.प चैतन्य महाराज कबीरबुवा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हभप पंडित महाराज क्षीरसागर, भारतीय जनता पक्षाचे किसान आघाडीचे सरचिटणीस संजय महाराज घुंडरे, उद्योगपती शुभम मेहरा, राजेश मेहरा तसेच विविध वारकरी शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी संजय महाराज घुंडरे यांनी उपक्रमाची माहीती दिली.ते म्हणाले, श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि महाराज मंडळी वास्तव्यास आहे, कोरोणाचे संकट निर्माण झाल्याने या विद्यार्थ्यांना मधूकरी साठी आसपास च्या गावात जाता येत नव्हते .या सर्व विद्यार्थ्यांना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आळंदीत चैतन्य महाराज कबीरबुवा, हभप पंडित महाराज क्षीरसागर आणि आळंदी शहरातील अनेक महाराज मंडळी यांनी दिलेल्या आवाहनला प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणा वरून दानशूर व्यक्तींनी समक्ष आपआपल्या परीने जमेल तेवढा किराणा माला तसेच भाजीपाला उपलब्ध करून दिला. महाराष्ट्रा तून सुध्दा काही अर्थिक स्वरुपात मदत केली या वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मदत करण्यात येत असल्याचे निलेश लोंढे महाराज यांनी सांगितले.