श्री शनी मारूती बालगणेश ट्रस्टचे वतीने सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप

509

पुणे प्रतिनिधी,

कोराना या संसर्गजन्य रोगाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून रोगाचा प्रादुर्भाव वाढु लागला आहे कोरोना विषाणुची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन कोथरूड एरंडवणे येथील
श्री शनी मारूती बालगणेश ट्रस्टने शनिजयंती चा खर्च कमी करून ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दीपक निकम
यांच्या सहकार्याने लोकवस्ती मध्ये सॅनिटायझर च्या अर्धा लिटर च्या बाटल्यांचे घरोघरी जाऊन 1500 कुटुंबांना वाटप करण्यात आले

फक्त वाटपच नाही तर त्याचा वापर कसा करायचा व काळजी कशी घ्यायची या विषयी माहीती दिपक निकम यांनी नागरीकांना दिली तसेच कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना सुचना देणेत आल्या व घरातुन बाहेर न पडण्या विषयी विनंती करण्यात आली