मासिक पाळी आणि महिला सबलीकरण क्षेत्रात मेडलाइफ फाउंडेशनचे देशभरात जनजागृती अभियान

899

मेडफेम च्या माध्यमातून करताय मासिक पाळी कप आणि कापडी पॅड ची जनजागृती

मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यात ठिकठिकाणी राबवताय मासिक पाळी जनजागृती अभियान मासिक पाळी म्हणजे निसर्गाने स्त्रीला दिलेले वरदान ज्यामुळे स्त्री जातीला नवनिर्मितीचा आनंद उपभोगता येऊ शकतो. मात्र या वरदानाकडे बघण्याचा दृष्टीकोन आजही काही उपेक्षेचाच आहे असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रगतीतुन आलेल्या प्रगल्भतेने यात दिवसागणिक बदल होत असला तरी तो बदल सद्ध्या स्थितीत पुरेसा नाही. महिन्यातून एकदा येणारी मासिक पाळी आणि तिचे चार दिवस महिलेच्या शारीरिक पातळीवर खुप त्रासदायक असतात. आणि जर या दिवसात उपेक्षेची वागणूक मिळाली तर तिला ते चार दिवस देखील बोचरे ठरतात. त्यामुळे हा काळ तिच्यासाठी असाह्य वेदनाही ठरु शकतो. त्यामुळे त्या दिवसात तिची मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक कुटुंबाचे कर्तव्य आहे. म्हणून *मेडलाइफ फाउंडेशन चे संस्थापक भुषण शिरुडे व सहकारी निवेदिता पगार/धारराव,अश्विनी चौमाल, मयुरी शिरुडे* आणि मेडलाइफ फाउंडेशन ची सर्व टीम गेल्या अनेक वर्षांपासून मासिक पाळी व तिचे व्यवस्थापन या विषयावर जनजागृतीपर अभियान राबवत आहेत.
आजही महिलांच्या मासिक पाळीवर उघडपणे बोलले जात् नाही. आजच्या आधुनिक आणि वैद्यकीय क्षेत्रात आपप झपाटय़ाने प्रगती करतोय तरी देखील समाजात मासिक पाळी विषयी अनेक फालतू गैरसमज लोकांच्या मनात अजूनही आहेत. याबाबतीत समाजात जनजागृती करणे, प्रबोधनपर कार्यक्रम करणे, योग्य वक्ता व डॉक्टर यांनी मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे. या म्हटले आहे कि, महिलांनी काळजी कशी घ्यावी व कोणते सॅनिटरी साधन वापरावे. मेस्टुअल कप हे एक मेडिकल ग्रेड सिलीकॉन पासून बनवलेले एक वैद्यकीय साधन मेडिकल डिव्हाइस आहे. हे अतिशय लवचिक असल्यामुळे वापरण्यास अगदी सोपे आहे. आरोग्यास लाभदायक, १२ तासापर्यंत लिक फ्रि प्रोक्टेशन, अनेक वर्ष सहज पुनर्वापरास योग्य परवडणारे असे आहे..
गेल्या अनेक वर्षापासून मेडलाईफ फाउंडेशन व मेडफेम इंडिया या सामाजिक सेवाभावी संस्था मासिक पाळीच्या शाश्वत सवयी या विषयावर जनजागृतीचे काम करत आहे.
माझ्या मित्र मैत्रिणींनो,
आज समाजात सर्वात जास्त समस्या जर असेल तर ती आरोग्याशी निगडीत आहे. त्यातही महिला व मुलींना आरोग्याच्या समस्यांचा जास्त सामना करावा लागतो.

मेडलाईफ फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून महिलांचे आरोग्य, मासिक पाळीच्या शाश्वत सवयी, मासिक पाळीच्या दरम्यान कोणती काळजी घ्यावी, कोणते सॅनिटरी साधन वापरावे तसेच महिला सबलीकरण, महिला उद्योजकता अश्या अनेक महिलांच्या निगडित विषयांवर मार्गदर्शनपर जनजागृतीचे निरंतर कार्य आम्ही करतोय.

सखींनो, आज 28 मे जागतिक मासिक पाळी दिन मासिक पाळी स्वच्छता दिन का साजरा केला जातो त्याबद्दल थोडा प्रकाश टाकूया

जर्मन येथील वॉश युनायटेड या संस्थेने ना नफा ना तोटा या सामाजिक सेवाभाव आधारावर 2013 साली जागतिक स्तरावर महिलांच्या मासिक पाळी सभोवतालच्या निषिद्ध गोष्टीचा नाश करण्यासाठी, तसेच जगभरात चांगल्या मासिक पाळी स्वच्छतेच्या व्यवस्थापणेचे महत्व जाणून घेण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.
★ आजकाल महिला मासिक पाळीमध्ये डिस्पोजेबल सॅनिटरी नॅपकिन म्हणजेच पॅड जास्त प्रमाणात वापरतात. परंतु हे नॅपकिन्स हानिकारक रसायने व प्लास्टिक ने बनलेले असतात आणि ते वापरल्यामुळे महिलांमध्ये बॅक्टरीयल इन्फेक्शन, राशेस, ईरिटेशन (खाजव), सर्वाईकल कॅन्सर, ओव्हरीयन कॅन्सर, इंडोमेट्रीओसीस सारख्या अनेक भयंकर समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यासोबतच या नॅपकिन्समूळे फक्त आरोग्यालाच नव्हे तर पर्यावरणाला आणि मुक्या प्राणीमित्रांना देखील फार मोठा धोका निर्माण होतोय.
यालाच पर्याय म्हणून आम्ही जनजागृतीच्या स्वरूपात मार्गदर्शन करून महिलांनी कापडी पॅड व मेन्स्ट्रुअल कप वापरावे, कारण हे अतिशय प्रभावी, आरामदायक आरोग्यास चांगले व पर्यावरणपूरक आणि सर्वाना परवडणारे साधन म्हणून वापरले जावू शकते

कापडी पॅड आणि मेन्स्ट्रुअल कप हा सर्वात चांगला पर्याय आहे असे आम्ही महिलांना सांगतो

★ मासिक पाळीच्या शाश्वत सवयी विषयाची जनजागृती व महिलांचे सबलीकरण जे आम्ही करतोय त्यासाठी महिलांचा अतिशय सकारात्मक व चांगला प्रतिसाद देखील मिळतोय.
सखींनो जर तुम्हाला आमच्या या अभियानामध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही आम्हाला फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या माध्यमाद्वारे संपर्क साधू शकता.
संपर्क – भुषण शिरोडे ७०२० ४३८८८१