गरजुंना रेशनिंग किटचे वाटप उत्साहात

499

अर्जुन मेदनकर, आळंदी 

येथील डी वाय पाटील विद्यापीठ चे डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे च्या वतीने उन्नत भारत अभियानातंर्गत पाच गावे चऱ्होली खु , सोळू , वडगाव घेनंद , कोयाळी, भोसे, दत्तक घेतली आहेत.या प्रत्येक गावात कोरोना या विषाणू मुळे अडचणीत असलेले मजूर, अपंग, विधवा, निराधार,स्थलांतरित मजूर यांना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप करण्यात आले.
यामध्ये भोसे ग्रामपंचायत या ठिकाणी किट चे वाटप करून कोरोना विषयी जनजगृती करून मास्क वाटप केलेे तसेच ग्रामपंच्यात कर्मचा-र्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप झाले. या वेळी सरपंच शितल चव्हाण,उपसरपंच, इतर सदस्य ग्रामसेवक बिंदुले ग्रामपंचायत मधील कर्मचारी व डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज चे डॉ अमिताभ बॅनर्जी विभाग प्रमुख कम्युनिटी मेडिसीन, उन्नत भारत अभियान समन्वयक, डॉ.श्यामकांत कुलकर्णी (मेडिकल ऑफिसर), जोसेफ चेरीयन (हेल्थ सुप्रिडेंट) ,लता खंदारे, प्रविण कोल्हे(वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते) स्वाती कडू, रामदास भाकरे,अनंता शिंदे,तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.