कम्युनिटी कार्यकर्ता तालुका अध्यक्ष पदी अर्जुन मेदनकर

549

आळंदी प्रतिनिधी,

खेड तालुका कम्युनिटी डॉक्टर आणि कम्युनिटी कार्यकर्ता तालुका अध्यक्ष पदी अर्जुन मेदनकर यांची नियुक्ती
आळंदी : मोरया सामाजिक प्रतिष्ठाण व नेहरू युवा केंद्र पुणे यांचा संयुक्त उपक्रमा अंतर्गत कम्युनिटी डॉक्टर-कम्युनिटी कार्यकर्ता या सेवाभावी संस्थेच्या तालुका अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार आणि जनहित फौंडेशन चे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना नियुक्ती पत्र राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष गणेश अंबिके सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष प्रितम किर्वे, संजय अहिरे, युवा अध्यक्ष निखिल येवले, रुपेश कदम, सुभाष स्वामी महाराज, सौरभ तापकीर, शैलेश सावतडकर, शिरिश कारेकर उपस्थित होते.
यावेळी खेड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून
अध्यक्ष – अर्जुन मेदनकर पत्रकार
उपाध्यक्ष – बाळकृष्ण पेठकर,
कार्याध्यक्ष – अविनाश बोरुंदीया,खजिनदार – अनिल फडके,सल्लागार – माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर,सचिव – किरण येळवंडे,सोमनाथ सरोदे,उपसचिव – डॉ.मुरलीधर आरु, भाग्यश्री तापकीर,प्रसिद्धी प्रमुख – पत्रकार सुनील ओव्हाळ व दिनेश कुऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्यकारणी सदस्य म्हणून प्रयाग मोझाड,विकास डेंगले,ज्ञानेश्वर टेंबेकर,सचिन वाघमारे,रवींद्र अरगडे,महेश डेंगले, सुयोग काबंळे,माउली घुंडरे,अनिराज मेदनकर,मयूर पेठकर यांचा समावेश आहे.