आबा रोकडे यांच्या निधनाने कोंढवा हळहळला

773

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

कोंढवा गावातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी उर्फ आबा रामचंद्र रोकडे यांच्या निधनाने कोंढवा गावावर शोक पसरला असून संपूर्ण गाव हळहळला आहे.

आबा गावातील सर्व सामाजिक , धार्मिक कार्यक्रमात नेहमी सहभाग घेत असत, हसतमुख चेहरा, सर्वाशी नम्रतेने बोलणे, लहान थोरांचा आदर असे विविध गुण आबांमध्ये होते. वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा त्यांच्या घरात आहे. त्यांच्या जाण्याने फार मोठी हानी झाल्याचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी मल्हार न्यूज शी बोलताना सांगितले.

आबा आमचा चांगला मित्र होता, त्यांच्या  जाण्याने कधीही भरून न येणारी हानी झाली आहे , असे मा.नगरसेवक भरत चौधरी यांनी यावेळी सांगितले , तर माजी आमदार महादेव बाबर यांनी आबा रोकडे यांच्या जाण्याचा शोक व्यक्त केला आहे.  

दरम्यान आबा रोकडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.