बोअरवेलचे सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी लाच घेणाऱ्या तलाठ्यास रंगेहात पकडले

493

पुणे प्रतिनिधी,

कोल्हापूर येथील शेतकऱ्याने  शेतजमिनीत बोअरवेल घेतली होती,  हुपरी सजा येथील शेतकरी यांनी तलाठी कार्यालयात  त्या बोअरवेलची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी गेले असता तेथील तलाठी कलापा देवाप्पा शेरखाने (वय 54) रा. प्लॉट न.54 संभाजीपूर आण्णासाहेब चकोते शालेसमोर जयसिंगपूर याने यातील तक्रारदार शेतकरी यांच्याकडे तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती , याबाबत शेतकऱ्याने मोठ्या हुशारीने तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या हवाली केले.

  याबाबत लाच लुचपत  प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रार शेतकरी यांनी आपल्या शेतजमिनीत घेतलेल्या बोअरवेलची नोंदणी सातबाऱ्यावर करावयाची होती. त्यानुसार त्यांनी हुपरी सजा येथील तलाठी कार्यालय गाठले , पण सदर सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी कलापा देवाप्पा शेरखाने यांनी ३हजार रुपयांची लाच मागितली. पण लाच दिल्याशिवाय आपले काम होणार नाही याची खात्री झाल्यावर तक्रारदार शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर येथील अधिकाऱ्यांशी  संपर्क करून तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री केल्यावर दिलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्याने त्यांनी सापळा लावला. तेंव्हा लाच घेताना कलापा शेरखाने यांना २हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.