संतांच्या पालखी मार्गावर वृक्ष संवर्धन करणार ;अभिनेते सयाजी शिंदे  

678

अर्जुन मेदनकर,आळंदी 

वारकरी संप्रदाय , आळंदी,देहू,पंढरपूर देवस्थानांसह सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून संतांचे पालखी मार्ग दुतर्फ़ा आणि पालखी तळांवर वृक्षारोपण , संवर्धन अभियान अंतर्गत हरित वारी चळवळ राबविण्यात येणार आहे. यासाठी रविवार (दि.२१) पासून मार्ग व पालखी तळांची पाहणी नियोजन होत असल्याचे अभिनेते वृक्षमित्र सयाजी शिंदे यांनी सांगितले.
 संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या भक्त निवासात आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगे पाटील, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख,देहू देवस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे,पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी मोरे , अभिनेते सयाजी शिंदे,लेखक अरविंद जगताप,आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर,श्रीधर सरनाईक आदींचे उपस्थितीत यासाठी बैठक झाली. या बैठकीत श्रीचे पालखी मार्गावर आणि पालखी तळांवर हरित वारी अंतर्गत वृक्षांचेरोपण  व वृक्ष संवर्धन अभियान म्हणून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नागरिक, सेवाभावी संस्था तसेच वारकरी भाविकांना वृक्षारोपणास यावेळी उपस्थितांनी आवाहन केले.  
 यावर्षीच्या वारीचे स्वरूप बदलले असून पायी वारी होत नसली तरी वारीची परंपरा कायम ठेवण्यात येत आहे. वृक्षमित्र व अभिनेते सयाजी शिंदे यांचे उपस्थितीत झालेल्या या बैठकीस वेगळे महत्त्व प्राप्त निर्माण झाले. राज्यात या निमित्त वृक्षारोपण करीत वृक्ष चळवळ बळकट करण्यास सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी आळंदीला भेट देऊन केले.
 यावेळी शिंदे म्हणाले,भाविकांनी वारी झाडाचे सानिध्यात साजरी करावी.गावातील जुन्या वृक्षास प्रदक्षिणा करावी.त्यास मिठी मारावी.आपल्याला विठ्ठल तिथे भेटेल.

तसेच आपापल्या परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन यावेळी सर्वानी केले. या वर्षीचे पायी वारी दिंडी पालखी सोहळ्याची आठवण म्हणून प्रत्येकाने आपापल्या भागात एकेक वृक्ष लावावा.
आळंदी देवस्थान वृक्ष संवर्धनास संरक्षक पिंजरे उपलब्द्ध करून देणार असून वृक्षारोपणास सहयाद्री देवराई संस्था तर्फे वृक्ष उपलब्द्ध करून देण्यात येणार आहे. येत्या आषाढी एकादशीला आपापल्या गावातील  जुन्या वृक्षास मिठी मारावी.वृक्ष लागवड करून श्री विठठल दर्शनाची अनुभूती घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.धागे पाटील यांनी देवस्थानच्या वतीने करण्यात येणारे नियोजन सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाचे १२ पालखी तळांवर प्रत्येकी ८ झाडे संताचे नांवे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगे पाटील, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, देहू देवस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे,पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी मोरे , अभिनेते सयाजी शिंदे,लेखक अरविंद जगताप यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.
 रविवार पासून (दि.२१) संत तुकाराम महाराज पालखी मार्ग,संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग तसेच या मार्गावरील मुक्कामाची ठिकाणे असलेले पालखी तळ या ठिकाणी वृक्षारोपणासाठी पाहणी नियोजनास सुरुवात करण्यात येणार असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.