पत्रकार उत्कर्ष यांच्यावर हल्ल्याप्रकरणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी

558

पुणे: शुक्रवारी संध्याकाळी दैनिक प्रभातचे पत्रकार ऊत्कर्ष खवले आपल्या आईला दवाखान्यात सोडून पुढे वानवडी येथील बातमी  कव्हर करण्यासाठी जात असताना समोरून दुचाकीवर येऊन एका व्यक्तीने पत्रकार उत्कर्ष यांच्या  अंगावर दुचाकी घातली याबाबत खवले व त्यांच्या आईने जाब विचारला असता मारहाण केली.

पत्रकार उत्कर्ष खवले यांच्या आईशी धक्काबुक्की करून अश्लील वर्तणूक केली.या सुमारास पत्रकार उत्कर्ष खवले यांच्या मानेला दुखापत झाली.त्यांचा भाऊ सोडविण्यासाठी आल्याने त्याच्या हाताला व पायाला मारहाण करून दुखापत केली आहे. या बाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.दरम्यान पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत यांच्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे सचिव अनिल चौधरी, उपाध्यक्ष रवी कोपनर,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नितीन बिबवे,श्रमिक पत्रकार संघाचे शिरिष रणदिवे  यांनी निवेदनाद्वारे कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्याकडे केली आहे. दरम्यान पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे प्रकरणात लक्ष घालून पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे कठोर कारवाईची मागणी केली आहे. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर,पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष कृष्णकांत कोबल ,दैनिक प्रभातचे पत्रकार विवेकानंद काटमोरे,मराठी पत्रकार समितीचे विश्वस्त एस.एम.देशमुख,नाथाभाऊ ऊंर्दे,अशोक आव्हाळे,सुनिल वाळूंज, यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी ध्वनी वरून संपर्क करून योग्य ती कारवाईची मागणी केली आहे.