ज्ञानेश्वर महाराज पादुका पंढरीला बसने जाणार ; वारीस अलंकापुरीत लगबग      

597

शासकीय अटीशर्तींचे काटेकोर पालन करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश  

अर्जुन मेदनकर,आळंदी

: राज्यातील कोरोनाचे वाढत्या संकटाचे पार्श्वभूमीवर राज्यात विविध संतांच्या पालखी सोहळ्याची परंपरा कायम ठेवण्याची बाब लक्षात घेऊन आषाढी एकादशीसाठी जाणार्‍या पुणे जिल्ह्यातील प्रमुख पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरला नेण्यास अति शर्तींवर पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीला परवानगी दिली आहे. अशी माहिती आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली.
 पुणे जिल्ह्यातून पंढरीला पायी वारी सोहळ्याची परंपरा जपणा-या पालखी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (आळंदी),संत तुकाराम पालखी सोहळा (देहू ) ,संत सोपान महाराज पालखी सोहळा (सासवड) , संत चांगावटेश्वर देवस्थान या संताच्या पालखी सोहळ्याचा समावेश आहे. यावर्षी पालखी सोहळा रद्द झाला असल्याने शासनाचे नियंत्रणात या पूर्वी परंपरांचे पालन करीत श्रींचे पालखी सोहळ्याचे पादुका पूजन ,मंदिर प्रदक्षिणा करीत प्रस्थान मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत झाले. आता प्रत्येक्ष श्रींचे पादुका केवळ २० लोकांचे हजेरीत बस मधून नेण्यास पुणे विभागीय प्रशासनाने देवस्थानला परवानगी काही अटींशर्तींवर दिली असल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली. शासनाचे परवानगीला अधीन राहून नियोजन व तयारी करण्याची लगबग आळंदी मंदिरात सुरु झाली आहे. तयारीचे अनुषंगाने कामकाज होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 यावर्षी पायी वारी नसल्याने शासनाने या बस सोबत परवानगी देताना उपजिल्हाधिकारी अथवा तहसिलदार या दर्जाचे अधिकारी  यांनी ( Incident कमांडर ) नियुक्त करण्यात येणार आहे.ज्ञानेश्वर महाराज पादुका पंढरीला बसने जाणार ; वारीस अलंकापुरीत लगबग      
शासकीय अटीशर्तींचे काटेकोर पालन करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश  
आळंदी : राज्यातील कोरोनाचे वाढत्या संकटाचे पार्श्वभूमीवर राज्यात विविध संतांच्या पालखी सोहळ्याची परंपरा कायम ठेवण्याची बाब लक्षात घेऊन आषाढी एकादशीसाठी जाणार्‍या पुणे जिल्ह्यातील प्रमुख पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरला नेण्यास अति शर्तींवर पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीला परवानगी दिली आहे. अशी माहिती आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली.
 पुणे जिल्ह्यातून पंढरीला पायी वारी सोहळ्याची परंपरा जपणा-या पालखी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (आळंदी),संत तुकाराम पालखी सोहळा (देहू ) ,संत सोपान महाराज पालखी सोहळा (सासवड) , संत चांगावटेश्वर देवस्थान या संताच्या पालखी सोहळ्याचा समावेश आहे. यावर्षी पालखी सोहळा रद्द झाला असल्याने शासनाचे नियंत्रणात या पूर्वी परंपरांचे पालन करीत श्रींचे पालखी सोहळ्याचे पादुका पूजन ,मंदिर प्रदक्षिणा करीत प्रस्थान मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत झाले. आता प्रत्येक्ष श्रींचे पादुका केवळ २० लोकांचे हजेरीत बस मधून नेण्यास पुणे विभागीय प्रशासनाने देवस्थानला परवानगी काही अटींशर्तींवर दिली असल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली. शासनाचे परवानगीला अधीन राहून नियोजन व तयारी करण्याची लगबग आळंदी मंदिरात सुरु झाली आहे. तयारीचे अनुषंगाने कामकाज होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 यावर्षी पायी वारी नसल्याने शासनाने या बस सोबत परवानगी देताना उपजिल्हाधिकारी अथवा तहसिलदार या दर्जाचे अधिकारी  यांनी ( Incident कमांडर ) नियुक्त करण्यात येणार आहे