कोंढवा बुद्रुक गाव आणि परिसर स्वयंफुर्तीने बंद ;१ ते ११जुलै राहणार बंद

2001

कोंढवा प्रतिनिधी,

कोंढवा बुद्रुक भागामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांनी एक आदर्श निर्णय घेऊन कोंढवा बुद्रुक गाव व परिसर १ जुलै २०२० ते शनिवार दिनांक ११ जुलै २०२० या काळामध्ये स्वयंफुर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे , याबाबत त्यांनी कोंढवा पोलीस ठाणे आणि पुणे महानगरपालिकेशी पत्रव्यव्हार केला असून लॉकडाऊन संदर्भात कळविले आहे.
याबाबत ग्रामस्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार , कोंढवा बुद्रुक व परिसरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे वेळीच कोरोनावर थांबविणे महत्वाचे असल्याने गावकऱ्यानी एकत्रित येऊन हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. नोकरी तसेच अति महत्वाच्या सेवेतील लोकांना याद्वारे विनंती केली आहे कि त्यांनी आपल्या गाड्या जेथे रस्ते बंद केले आहेत किंवा बॅरिकेट्स लावले आहेत अशा ठिकाणी बाहेर लावाव्यात . याकाळात गावात जाणारे व येणाऱ्या गाडयांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे तसेच सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन गावातील नागरिकांनी केले आहे.

सदर कालावधीत किराणामालाची दुकाने आणि भाजीपाला, दूध ही दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहतील अत्यावश्यक सेवेमधील मेडिकल दवाखाने पूर्णवेळ उघडे राहतील तरी या बाबत सर्व दुकानदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले आहे. बंद करण्यात आलेले रस्ते खालील प्रमाणे :- 
गावातील बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम वाघवस्ती, माने हाॅस्पीटल, मल्हार चौक, भोलेनाथ चौक, मारुती मंदिर, शांतीबन सोसायटी समोरील गावाची entry ,भगवा चौक, लक्ष्मीनगर एंट्री पॉईंट तसेच इतर भाग पूर्णपणे सील करण्यात येणार आहे. याप्रसंगी जालिंदर भाऊ कामठे,गणेश वसंत कामठे, शिरीष धर्मावत, बजरंग वाघ, राकेश राजेंद्र कामठे, विनायक कामठे, राहुल बाजीराव कामठे, राहुल दिनकर कामठे, अमित जगताप, अमोल धर्मावत, किरण ठोसर, दत्ताभाऊ हगवणे, संभाजी मारुती कामठे, महेश दिनकर कामठे, विठ्ठल घोमण तसेच कोंढवा बु गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.