चक्रीवादळात माणगावमधील मृत व्यक्तींच्या वारसांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

449

गिरीश भोपी,पनवेल

3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले.
या चक्रीवादळात माणगाव तालुक्यातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदतीचे धनादेश आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, नगराध्यक्ष योगिता चव्हाण, नगरसेवक आनंद यादव, रत्नाकर उभारे, संदीप खरगंटे, संगिता बक्कम, प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, मुख्याधिकारी श्री.राहुल इंगळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
चक्रीवादळात मृत पावलेले उणेगाव येथील कै.ललित नथुराम सत्वे यांचे वारस निकिता सत्वे, निशा सत्वे, नथुराम सत्वे, स्नेहा सत्वे, निकेश सत्वे यांना प्रत्येकी वीस हजार रुपये रक्कमेचे धनादेश यावेळी देण्यात आले. यापूर्वी शासनाच्या सुधारीत निकषानुसार यांना प्रत्येकी ऐंशी हजार रुपये रक्कमेचे धनादेश देण्यात आले होते.
तसेच बाटेचीवाडी येथील मृत व्यक्ती कै.सचिन सुरेश काते यांचे वारसदार श्री.सुरेश काते यांना एक लाख रुपये रकमेचा धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते देण्यात आला.
☔00000☔