आळंदीतील इंद्रायणी नदीला प्रदुषणाचे ग्रहण ; दुषित पाण्याने नदी प्रदुषणात वाढ

594

अर्जुन मेदनकर, आळंदी

येथील इंद्रायणी नदीत पिंपरी चिंचवड महापिलिकेचे हद्दीतुन नदीत थेट कारखान्यातुन रसायन मिश्रित व मैला मिश्रित सांडपाणी सोडले जात असुन याकडे राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे.यामुळे सोमवारी नदीचे प्रदुषणात वाढ झाल्याने आळंदीतुन वाहणारी नदी दुषित पाण्याने फेसाळली.यात नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी ची समस्या कायम असुन नदी प्रदुषणाने आळंदीकर नागरीक व भाविकांत नाराजी आहे.

 नदी प्रदुषित झाल्याने याच पाण्यावर जलशुद्धीकरण करताना आळंदी नगरपरीषद यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. नागरीकांना पिण्याचे पाण्यासाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे.नदी प्रदुषण कमी करण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाने संबंधित घटकांवर कारवाई करण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे.आळंदीकर नागरीकांना पिंपरी महापालिकेने नैतिक जबाबदारी घेऊन शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पेठकर यांनी केली आहे.
 महापालिकेने पावसाची वाट न पाहता नदीवरील फोफावलेली जलपर्णी नदी पात्रा बाहेर काढण्याचे काम करण्यास प्राधान्य देण्याची गरज असताना महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आळंदीतील नदी प्रदुषण वाढल्याने वारकरी,नागरीकांत नाराजी आहे