आळंदी कोरोना रोखण्यास लॉकडाउनला नागरिकांचा प्रतिसाद

426

आळंदी / प्रतिनिधी : आळंदी नगरपरिषद हद्दीतुन कोरोना हद्दपार करण्यास आळंदी नगरपरिषद, महसूल व पोलीस,आरोग्य सेवा प्रशासनाने शहरातील नागरिकांना प्रभावी लॉकडाउनचे १४ ते २४ जुलै २०२० या काळात नागरिकांनी घरी सुरक्षित राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.मंगळवारी पहिल्या दिवशी आळंदी परिसरातील नागरीकांनी या नव्या लॉकडाउनला मोठा प्रतिसाद दिला.आळंदीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सर्व स्तरातील दुकानदारांनी तसेच नागरिकांनी साथ देत घरी सुरक्षित राहणे पसंत केले.
 आळंदी शहरासह पंचक्रोशीतील काही गावांत देखील १४ जुलै पासून कडक लॉकडाउनची कार्यवाही जिल्हा प्रशासनाचे मार्गदर्शन खाली सूचनादेश प्रमाणे करण्यात आली आहे. आळंदीतही मुख्याधिकारी अंकुश जाधव,नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे तसेच जिल्हा पोलीस व महसूल यांचे सूचना आदेशाने शहरात लॉकडाउनचे कामकाज प्रभावी पणे सुरु करण्यात आले. आळंदी पोलिसांनी शहरातील प्रवेशाचे मार्गावर नाकाबंदी करीत कार्यवाही केली.ठीकठिकाणी बंदोबस्त असल्याने नागरिकांनी देखील विनाकारण बाहेर पाडण्याचे टाळले.अत्यावश्यक सेवा व कामगार बसेस नेहमी प्रमाणे कामगारांची वाहतूक करताना दिसल्या.एरव्ही गजबजलेली वर्दळीची आळंदी मात्र लॉकडाउन सुरु असल्याने निर्मनुष्य दिसली. येथील प्रदक्षिणा मार्ग,मरकळ रस्ता,वडगाव रस्ता,चाकण रस्त्यावर नागरिकांची वर्दळ फारसी आढळली नाही.
 आळंदी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाचे आवाहनास आळंदीत नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पोलिसांनी विना कारण नागरिकांनी घर बाहेर पडू नये यासाठी जनजागृती करीत लॉकडाउनचे नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.केवळ मर्यादित वेळेत दूध विक्री,पेपरचे वितरण झाले.  याशिवाय मेडिकल अत्यावश्यक आरोग्य सेवा सुरु ठेवण्यात आली. इतर सर्व प्रकारच्या आस्थापना दुकाने बंद ठेवून व्यापा-यांनी प्रशासनाचे आवाहनास साथ दिली.
 आळंदीत कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून प्रवेशावर मर्यादा आणण्यात आल्या असल्याचे अधीक्षक किशोर तरकासे यांनी सांगितले.
 खेड प्रांत संजय तेली यांनी जिल्हा प्रशासनाचे आदेश नुसार कडक लॉकडाउन जाहीर केला असून विना कारण फिरना-यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रांत संजय तेली यांनी दिला आहे. यामुळे नागरिकांनी घरा बाहेर विनाकारण येऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आळंदीतील वाढता  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ जुलै पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.