योगगुरू दीपक महाराज यांच्याकडे कोविड रुग्णांसाठी योगाची मागणी

1478

पुणे प्रतिनिधी,
पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे , त्यामुळे महापालिकेने पुण्यात कोविड सेंटरची उभारणी केली आहे. पुणे महापालिकेचे सह.आयुक्त माधव जगताप यांच्यासोबत ब्रम्हयोग मुहूर्त ज्ञानपिठाचे योगगुरू दीपक महाराज यांनी विमाननगर येथे पुणे मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर ला भेट दिली होती, यावेळी जगताप यांनी दीपक महाराज यांच्याकडे कोविड रुग्णांसाठी त्यांना चांगले आरोग्य लाभण्यासाठी तसेच सुदृढ निरोगी आयुष्यासाठी योगाची मागणी केली.
गुरुजींनी देखील क्षणाचा विलंब न करता गुरुदेव दीपकजी यांनी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना योगा बद्दल तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याविषयक मार्गदर्शन केले. निरोगी आयुष्यासाठी योग महत्वाचा असून योग व्यायाम केल्याने आपल्याला घातक अशा कोरोना सारख्या विषाणूंना दूर ठेवता येते असा सल्ला देखील याप्रसंगी त्यांनी दिला. गुरुदेव दीपक महाराज यांच्या भेटीने कोरोना रुग्णांचे मनोबल वाढल्याची भावना येथील रुग्णांणी व्यक्त केले.
यावेळी गुरुदेव दीपकजी यांच्यासमवेत डॉ.सुनील जगताप (साई स्नेह हॉस्पिटल कात्रज पुणे) व ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे अध्यक्ष श्री. शशिकांत आनंदास हे उपस्थित होते.

दीपक महाराज यांनी कोरोना काळात नागरिकांना विविध ठिकाणी भेटी देऊन नागरिकांचे मनोधैर्य वाढवीत होत होते. ते विषाणू बद्दल माहिती देऊन नागरिकांना घाबरून न जाता त्यांना मानसिक आधार देत होते. तसेच त्यांनी विवीध योगासणांचे धडे देऊन अनेक नागरिकांना कोरोना पासून दूर ठेवण्यात मोठी मदत केली आहे. त्यांचे हे काम निस्वार्थीपणे , मोफत करत असून कोणाला काही अडचण असल्यास त्यांनी ब्रम्हयोग मुहूर्त योग् ज्ञानपीठ केंद्र तसेच साधकांशी संपर्क करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.