आपले शरीर हेच कल्पतरु आहे; योगगुरू दीपक महाराज

1440

वर्धापनदिनी साधकांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन

कोंढवा प्रतिनिधी
कोरोना महामारीला घाबरुन जाण्याची गरज नाही. त्याला दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार, स्वच्छता पाळा व्यसनापासून दूर राहा, तुम्हाला हवे ते तुमचे शरीर तुम्हाला देईल. आपले शरीर हेच कल्पतरु आहे त्याला ओळखण्याची गरज आहे. असे विचार ब्रम्हमुहर्त योग ज्ञानपीठाचे योगगुरु दिपकजी महाराज यांनी कोंढवा येथे व्यक्त केले.


कोंढवा खुर्द येथे ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचा वर्धापन सोहळा पार पडला. त्यावेळी मोजक्याच साधकांना मार्गदर्शन करताना दिपकजी महाराज बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन विजय लोणकर, ममता चोरडीया यांनी केले होते. यावेळी गुरुमाऊली वैशालीजी, नगरसेविका नंदा नारायण लोणकर, माजी नगरसेवक तानाजी लोणकर, उद्योगपती राजेंद्र भिंताडे, ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या अध्यक्षा अश्विनी पासलकर, अनिल चौधरी, बन्शीधर चरापले, आनंद शेळके, कालिदास लोणकर, मोरे मॅडम यांच्यासह परिसरातील नागरिक व साधक यावेळी उपस्थित होते.


कोरोना व्हायरस सारख्या महामारीला थोपविण्याचे काम योगा करत आहे. भारतातील योगाच जतन विदेशात केले जात आहे. सर्वांनी योग साधनेचा आधार घेवून सदरुढ राहुया असे आवाहन उद्योगपती राजेंद्र भिंताडे यांनी यावेळी केले.तसेच ममता चोरडिया यांनी योगगुरू दीपक महाराज यांच्याविषयी कृतज्ञेचा भाव व्यक्त केला तर नायडू मॅडम यांनी योगगुरू दीपक महाराज यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण रोग मुक्त झाल्याचे मनोगत व्यक्त केले. औटी सरांनी कोरोना काळात आपण गुरुदेव-गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या औषधांमुळे आपण ठणठणीत बरे झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र औटी, ममता चोरडीया यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुधीर गरुड, विजय लोणकर यांनी मानले.