लोणीकंद गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई

456

नाथाभाऊ ऊंद्रे, मांजरी

नऊ महिन्या पासून दोन आरोपी फरार होते,त्यांना लोणीकंद गुन्हे शोध पोलीसांनी तांत्रिकदृष्ट्या, गोपनीय बाबींचे आधारे जेरबंद करण्यात यशस्वी झाले आहे. आरोपी कडून चोरलेला माल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत १८/११/२०१९ रोजी विविध कलमा अंतर्गत (१४३,१४७,१४८,१४९,३३६,३३७,३२४,३२३,३९५,४२७) आरोपी१)दत्ता रंगनाथ गायकवाड वय २१ वर्षे, रा.जे.जे .नगर वाघोली काळे यांच्या खोलीत.२)किशोर विश्वनाथ जाधव वय २० वर्षे, रा.गुरकृपा आश्रम पाठीमागे दुबे नगर वाघोली ता.हवेली अशी आहेत. तर दत्ता रंगनाथ गायकवाड वर चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीचा गुन्हा दाखल आहे.

सदर आरोपीनी त्यांच्या घरात ठेवलेले १,५४,०००/रुपये किंमतीचे २९ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

सदर कार्यवाही संदीप पाटील पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, विवेक पाटील अप्पर पोलीस अधीक्षक ,डॉक्टर सई भोरे पाटील हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी,प्रताप मानकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय ढोणे साह्यक पोलीस निरीक्षक, हणमंत पडळकर पोलीस उप निरीक्षक, बाळासाहेब सकाटे,श्रीमंत होनमाने,संतोष मारकड,दत्ता काळे,समिर पिलाणे,ऋषिकेश व्यवहारे,सुरज वळेकर या पथकाने कार्यवाही केली.