स्वातंत्र्य दिनी गुरुदेव दिपक महाराज यांनी दिला कोरोना मुक्तीवर योगाचा कानमंत्र

746

अनिल चौधरी,कोंढवा:-

भारताचा आज स्वातंत्र्य दिन , भल्या पहाटे 4 वाजता म्हणजेच ब्रम्हमुहूर्तावर साधकांची लगभग….. बाहेर कोसळणारा पाऊस …… तरीही महिला तसेच पुरुषांची योगासाठी पावसात हजेरी …. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर गुरुदेवांना भेटण्याची आस…… अखेर गुरुदेव दीपक महाराज यांचे टाळ्यांच्या कडकडाटाने स्वागत….. हे सर्व अनुभवले कोंढवा भागातील ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या साधकांनी लोणकर हॉल मधील छोट्याखानी कार्यक्रमात ….

गेले पाच महिने कोरोना महामारीमुळे बंद असलेला योगा क्लासेस ची सुरुवात आजस्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर अद्यायावत अशा नव्याने झालेल्या लोणकर हॉल मध्ये गुरुदेव दीपक महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.  याप्रसंगी सोशल  डिस्टन्सचे तसेच शासनाचे सर्व नियम पालन केले होते.

यावेळी गुरुदेव दीपक महाराज यांनी साधकांना जिभेचे महत्व पटवून दिले तसेच तिच्यावर नियंत्रण ठेवणे किती महत्वाचे आहे याचे महत्व पटवून दिले. कोरोना काळाच्या या महामारीमध्ये जे ब्राम्हमुहूर्त योग केंद्रामध्ये योग प्रकार करतात, व्यायाम करतात अशा एकाही साधकाला कोरोना झालेला नाही. त्यामळे नागरिकांनी कोरोना सारख्या महामारी, इतर आजारांवर योग साधना आणि योग्य खबरदारी घेतली तर आपण सर्व प्रकारच्या आजाराना दूर करू असेही ते यावेळी म्हणाले. लोणकर हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल महेंद्र लोणकर, अजित लोणकर तसेच लोणकर परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले.

       याप्रसंगी गुरुमाऊली वैशालाजी, मा. नगरसेवक तानाजी लोणकर, नगरसेविका नंदा लोणकर, नारायण लोणकर, राजेंद्र भिंताडे, अश्विनी पासलकर,आनंदास सर औटीसर सुधीर गरुड , ममता चोरडीया, शशिकांत पुणेकर ,उतम फुलावरे, विजय लोणकर, कालिदास लोणकर, संतोष गोरड आदी उपस्थित होते.