आव्हाळवाडीमध्ये किराणा दुकानात घरफोडी चोरी करणारा चोर गजाआड; लोणीकंद डी बी पथकाची कारवाई

511

मुद्देमाल परत मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना फिर्यादी शिवाजी भोसले.

 

 

नाथाभाऊ उंद्रे, मांजरी

लोणीकंद पोलीस ठाणे गु र नं 766/2020 भा दं वि कलम 457, 454, 380 प्रमाणे दि 12/08/2020 रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे शिवाजी रामजी भोसले वय 28 वर्षे, रा. इंद्रायणी कॉम्प्लेक्स, आव्हाळवाडी, ता हवेली जि पुणे हे दि15/07/2020 रोजी ते दि 12/08/2020 रोजी चे दरम्यान धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचे मूळगावी परभणी येथे त्यांचे नातेवाईकांसोबत गेले होते. गावाहून आल्यानंतर ते नेहमीप्रमाणे किराणा दुकानाकडे गेले असता दुकानाचे शटरला असलेले दोन कुलुपे हे अलगद अडकवलेले दिसले. तसेच शटर उघडून आत येऊन पाहणी केली असता दुकानातील एकूण 38,680रु किंमतीचा किराणा माल व काउंटरचे ड्रॉवरमधील 2000रु रोख रक्कम असा एकूण 40,680रु किंमतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतः चे फायदेकरिता फिर्यादीचे संमतीशिवाय दुकानाचे शटरचे दोन्ही कुलुपे अलगद काढून आत प्रवेश करून घरफोडी करून चोरुन नेलेवरून गुन्हा दाखल होता. म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी रवाना होऊन गुन्ह्यातील गेले मालाचा व अज्ञात आरोपीचा लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत शोध सुरु केला होता. दि 12/08/2020 रोजी वाडेबोलहाई अष्टापुर रोड वर पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शोध पथकाचे पो.हवा बाळासाहेब सकाटे, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे यांना एका इसमाचा संशय आल्याने पथकाने त्यास हटकले. परंतु त्यास पोलिसांची चाहुल लागताच तो पळून जाऊ लागल्याने त्यास मोठ्या शिताफीने पाठलाग करून सापळा रचून ताब्यात घेतले. त्याचेकडे कसून तपास केला असता त्याने त्याचे नाव जयेश चंद्रशेखर खिच्ची वय 37 वर्षे, रा. केशवनगर, पुणे असे सांगून त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपिकडून गुन्ह्यातील एकूण 40,680रु किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. मा. कोर्टाने त्यास 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई ही मा. श्री. प्रताप मानकर (पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. हणमंत पडळकर (पोलीस उपनिरीक्षक), श्री. बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, संतोष मारकड, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांनी केली आहे.