गुरुदर्शनाने साधक झाले मंत्रमुग्ध

839

अनिल चौधरी,कोंढवा:

गुरुदेव श्री दीपक महाराज स्वामी हे महाराष्ट्राला लाभलेले योगगुरू आहेत. त्यांचा उपदेश महाराष्ट्राला जागृतीचे धडे देत आहे. गुरू पुष्कळ असतात, पण जो गुरू आत्मज्ञानाचे दर्शन घडवून देतो तोच खरा गुरू असे शास्त्र सांगते. सर्व काही नष्ट झाल्यावर जे उरते तोच आत्मा. त्या आत्म्यालाच ब्रह्म असे म्हणतात. त्याच परब्रह्माचे दर्शन श्री दीपक गुरुजींनी आज साधकांना दिले तसेच निरोगी आयुष्याचा मंत्र दिला यामुळे येथील वातावरण मंत्रमुग्ध असे झाले होते…

ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्र कोंढवा हॉलच्या वतीने गुरुदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरुदेव दीपक महाराज आणि गुरुमाऊली वैशालीजी यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. कोरोनावर मात करायची असेल तर नियमित योग, साधना, व्यायाम तसेच योग्य आहार घेतल्यास आपल्यास कुठलाच आजार जडणार नाही असे मोलाचे मार्गदर्शन गुरुदेवांनी यावेळी केले. केंद्राचे नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील सर्व साधकांना करण्यात आले.’जीवनाचे नैराश्य घालवून चैतन्य उत्पन्न करणारी’ शिकवण ब्राम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राची आहे.

याप्रसंगी नगरसेविका नंदा लोणकर, मा. नगरसेवक तानाजी लोणकर, राजेंद्र भिंताडे, सुधीर गरुड, शशिकांत आनंददास, अश्विनी पासलकर, सर्व कोचर टीम तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.                                       ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्रासाठी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल महेंद्र लोणकर, अजित लोणकर यांचा सन्मान करण्यात आला.
                 कार्यक्रमाचे आयोजन विजय लोणकर, कालिदास लोणकर, रवींद्र औटी, अनुजा लोणकर,उर्मिला भालेराव, ममता चोरडिया यांनी केले होते, तर आभार सुधीर गरुड यांनी व्यक्त केले.