Friday, March 21, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेभाजपतर्फे आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत प्रिया कुर्‍हाडे प्रथम

भाजपतर्फे आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत प्रिया कुर्‍हाडे प्रथम

अर्जुन मेदनकर, आळंदी

: शहरातील गणेशोत्सवावर जरी कोरोणाचे संकट असले तरीही महीलांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी आळंदी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करुन विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या प्रयत्नातुन हा उपक्रम राबविण्यात आला.
सदर घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक – प्रिया कुर्‍हाडे, द्वितीय क्रमांक – मोक्षदा पोफळे,तृतीय क्रमांक – मनिषा सुडे यांनी मिळवला आहे तर उतेजनार्थ खुशी बोरुंदिया यांना गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी भाजप महीला मोर्चा तालुकाध्यक्ष अॅड.मालिनी शिंदे,शहराध्यक्ष किरण येळवंडे,अॅड.प्रितम शिंदे, संदेश जाधव,सचिन काळे,युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश जोशी, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे,सदाशिव साखरे, संतोष हजारे,गणेश उंबरे, सचिन सोळंकर, पत्रकार अर्जुन मेदनकर , दिनेश कुऱ्हाडे उपस्थित होते.
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळां बरोबरच घरोघरी घरगुती गौरी-गणेशा चीही सुंदर आरास आळंदीत केली जाते.घरोघरी छोटे खानी देखावे साकारले जातात.अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील यावेळी देण्यात आला. या घरगुती देखाव्यांना प्रसिध्दी मिळावी, त्याचे कौतुक व्हावे तसेच घरगुती गौरी-गणेश सजावटीसाठीच्या कौशल्य, कला, गुणांना अधिकाधिक वाव मिळावा यासाठी भाजप तर्फे या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यास मोठा प्रतिसाद मिळाल्याचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!