Wednesday, February 19, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीसर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी 'माझे संकलन, माझी जबाबदारी' मोहिम महत्त्वपूर्ण -जिल्हाधिकारी...

सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन
पुणे,दि. 1: कोरोना आपत्ती निवारणाच्या कामासोबतच प्रलंबित तसेच दैनदिन कामकाज गतीने होण्यासाठी माझे संकलन, माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे, कोरोना विषयक कामकाजासोबतच इतर विकासकामे व सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माझे संकलन, माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोरोना संसर्ग कालावधीत संपूर्ण प्रशासन कार्यरत आहे, त्यामुळे नागरिकांचे दैनदिन कामकाज प्रलंबित राहण्याची शक्यता विचारात घेत ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, माझे संकलन, माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत प्रलंबित कामे गतीने मार्गी लावा, तसेच कार्यालयातीन कामकाजात सकारात्मकता ठेवून गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
झिरो पेंडन्सी अभियानाच्या माध्यमातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सातत्याने राज्यात आदर्श निर्माण केला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, प्रत्येकाने आपल्या कार्यालयात येणा-या प्रत्येकाच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कार्यालयीन कामकाज सांभाळताना प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होणार आहे. शासनाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी टिम म्हणून काम करा, कोरोनासोबतच सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया, यामध्ये प्रत्येकाचे योगदान गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख म्हणाले, दैनदिन प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम उपयुकत् ठरणार आहे. प्रशिक्षण व क्षमता बांधणी, अभिलेख कक्षाचे अद्ययावतीकरण व कालबाहय अभिलेख, प्रलंबित टपाल कार्यविवरणाला नोंदवणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आढावा, सहा गठठा पदधती, टपालावरील प्रक्रिया, टिपणी सादर करण्याची पदधती यासोबतच ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिमे बाबत मार्गदर्शन केले. आभार निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी मानले.यावेळी जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय प्रांत अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!