सुभद्रा जाधव यांच्या निधनाने आळंदीत हळहळ व्यक्त

172

अर्जुन मेदनकर,आळंदी प्रतिनिधी,
सुभद्रा संपतराव जाधव वय वर्षे ५५ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याने आळंदीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अतिशय प्रेमळ स्वभावाच्या सुभद्राताईंच्या जाण्याने आळंदीवर दु:खाचा डोंगर पसरला आहे.

त्यांच्या पश्चात त्यांना वडील, पती, भाऊ,बहीनी, ५ मुली, पुतणे, पुतण्या, सुना, जावई,नातू आणि नाती असा परिवार होता.पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदकाचे मानकरी संपतराव जाधव यांच्या पत्नी, शिरुर ग्रामीण चे सरपंच नामदेवराव जाधव यांच्या भावजय आणि आळंदीचे पत्रकार दिनेश कु-हाडे यांच्या सासु होत.