उंड्री पिसोळी खराब रस्त्याचा आणखी एक बळी

1574

रस्ते प्रशासनाने काञज मंतरवाडी रस्त्याकडे वेळीच लक्ष्य द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन; राजेंद्र भिंताडे
कोंढवा :
काञज मंतरवाडी बायपास रस्त्यावर पिसोळी गावठाण हद्दीमध्ये भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने,संदीप माणिकचंद कोचेटा, वय 26, राहणार दत्तनगर आंबेगाव कात्रज दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. रस्ता खराब असल्याने हा अपघात घडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वाहनचालकास अटक करण्यात आली आहे त्वरित रस्ते प्रशासनाने या रस्त्याकडे काळजी पुर्वक लक्ष्य घालावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राजेंद्र भिंताडे यांनी दिला आहे.
शनिवारी दुपारी हा अपघात पिसोळी हद्दीमध्ये घडला. या अगोदर या रस्त्यावर अनेक अपघात घडले असून, अनेकांचे बळी गेलेत तर, काही जणांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून रस्त्या संदर्भात सर्व पक्षीय नेत्यानी लेखी व तोंडी सांगून देखिल प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. खराब रस्त्यामुळे उडणार्या धुळीचा व धुराचा ञास रस्त्या लगतच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सोसला असून, श्वसनाच्या ञासाने अनेकजण बिस्तार्यामध्ये पडून आहेत. २४ तास आबालवृध्द नागरिकांना सांभाळावे लागत आहे. अंनत यातना लोक सोसत आहेत. नाहक नागरिकांचे बळी जात आहेत. प्रशासनाला जाग आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असून, खडीमशीन चौकापासून मंतरवाडी व मंतरवाडी कडून खडीमशीन चौकाकडे एक ही वाहन जावू देणार नाही. असा इशारा राजेंद्र भिंताडे यांनी दिला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी भिलारे, दिगंबर पाटोळे, अतुल शिरसाट व डोईफोडे यांच्याकडे तपास चालु आहे कोंढवा पोलिस तपास करत आहेत.