आळंदी नवरात्र मंदीरात परंपरांचे पालन

600

अर्जुन मेदनकार, आळंदी 

येथील माऊली मंदीरात परंरांचे पालन करीत नवरात्र व दसरा तथा विजयादशमी चा सोहळा साजरा झाला.
करोना महामारी च्या पार्श्वभूमीवर यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने प्रथा परंपरा पाळत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात मुक्ताबाई मंडपात माऊली देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर ,माऊलींचे मानकरी बाळासाहेब कु-हाडे पाटील यांच्या हस्ते आपट्याची पूजा होऊन मंदिरामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. संतोष मोरे यांनी दिंडी प्रदक्षिणा केली .यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, माऊलीचे मानकरी योगेश अारु आदी उपस्थित होते. यावेळी पौराहित्य श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले. श्रींचा नारळ प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.