आळंदीतील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदीरात श्री विठ्ठल रुप दर्शन

771

अर्जुन मेदनकर,आळंदी
येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संजीवन समाधी मंदीरात क्षेत्रोपाध्ये श्रींचे पुजारी गांधी परीवाराने भक्तीमय उत्साहात शनिवार (दि.१७) श्रींचे श्री पांडुरंग स्वरुपात दर्शन रुप साकारले. यासाठी श्रींचे पुजारी मुकुंद गांधी, नितीन गांधी तसेच कौस्तुभ, मनिष,आशिष, श्री हरी,ओंम,सर्व गांधी परीवारातील पुजारी मंडळींनी श्रींना वैभवी पोषाख केला आहे.यावेळी श्रींचे लक्षवेधी रुप पाहून मंत्रमुग्ध होत होते.