प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाफारे यांना विडगुड टेक्नोलॉजी फ़ँक्टरी गोवा या संस्थेचा इंटरनॅशनल सायंन्सटिस्ट अवार्ड पुरस्कार प्रदान

432

आळंदी (अर्जुन मेदनकर ) : येथील एमआयटी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाफारे यांना विडगुड टेक्नोलॉजी फ़ँक्टरी गोवा या संस्थेचा विज्ञान व वाणिज्य या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या व्यक्तीस दर वर्षी इंटरनॅशनल सायन्सटिस्ट अवार्ड हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या वर्षीचा इंटरनॅशनल सायन्सटिस्ट अवार्ड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाफारे यांना प्रदान करण्यात आला . डाॅ.वाफारे यांचे गणित या विषयामध्ये सातत्याने संशोधन चालु असते. सरांचे संशोधन क्षेत्रातील काम उल्लेखनिय आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध नियत कालिकांमध्ये ११० संशोधन पेपर प्रकाशित झालेले आहेत. गेले २८ वर्षापसून सर या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सरांचे प्राथमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण पारनेर तालुक्यातील कर्जुले हरया या गावात झाले. व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातल्या नामांकित फर्गुसन महाविद्यालयात झाले . पदवीत्तर शिक्षण व पीएच डी पुणे विद्यापीठातील गणित विभागातून झालेली आहे. सरांना आतापर्यंत विविध शासकीय व अशासकीय संस्थाकडूंन १९ पुरस्कार मिळालेले आहेत. गेल्या १९९९ पासून मायर्स एमआयटी या संस्थेच्या महाविद्यालयात विविध पदांवर कार्यरत आहेत. २००७ पासून एमआयटी कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य पदावर ते कार्यरत आहेत.