डोंबारीचा खेळ करून उपजीविका करणाऱ्यांना दोन महिन्याचे रेशन

436

पुणे प्रतिनिधी,

 रस्त्यावर खेळ करुन आपले पोट भरणाऱ्या डोंबारी कुटूंबाला महिना दोन महिने पुरेल इतके रेशन उंड्रीतील युवा उद्योजक राजेंद्र भिंताडे यांच्या कडून देण्यात आले.
            राज्यात पसरलेल्या कोरोना महामारीत सर्व सामान्य जनता होरपळून निघाली आहे. आर्थिक दृष्ट्या हतबल झाली आहे. त्यांच्या हाताला काम नाही , महागाईत प्रचंड वाढलेली आहे. लोकांना हाताला काम नाही, लोक मिळेल ते काम करून आपली उपजीविका करत आहेत. अशावेळी रस्त्यावर खेळ करत आपले पोट भरणाऱ्या कष्टकरी व्यक्तींना आजही दोन वेळच्या जेवणासाठी रस्त्यावर जोखमीचे खेळ करावे लागत आहे. भर उन्हात हे कुटुंब डोंबारी खेळ करत होते, भर दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने हे खेळ करणारे घामाघूम झाले होते, परंतु पोटाची खळगी भरून काढण्यासाठी हे कुटुंब आपली कला सादर करत होते. त्याच वेळी या परिसरात उद्योजक राजेंद्र भिंताडे हे तिथे आले आणि भर उन्हात हे कुटुंब घामाघूम झालेले पाहिले, त्यानी त्या कुटुंबाची आस्थेने चौकशी करून त्वरित त्यांना त्वरित मदत म्हणूून दोन महिने पुरेल एवढे राशन या कुटुंबाला मदतीचा हात म्हणून जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी दिले आहे.तर त्या कुटूंबाने अजूनही समाजात माणुसकी जिवंत आहे, आपल्या ह्या मदतीमुळे आम्हाला मोठा आधार झाला असून आपल्याला दीर्घायुषी होण्याचा आशीर्वाद देखील यावेळी दिला. तर भिंताडे यांनी  हे  माझे कर्तव्य असून आपल्याला भविष्यात कधीही गरज लागल्यास संपर्क करण्यास सांगितले .याप्रसंगी दादासाहेब लोणकर,महेंद्र लोणकर, संतोष गोरड उपस्थित होते.