महिला दिनाच्या निमित्ताने कर्तुत्ववान महिलांच्या हिरकणी गौरव पुरस्कार देऊन सन्मान

548

आर एस पी अधिकारी युनिटच्या प्रशंसनीय उपक्रम

शेख इम्रान
जागतिक महिला दिनानिमित्त आर एस पी अधिकारी युनिटच्या माध्यमातून आर एस पी चे महासमादेशक माननीय अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, कमांडर मनीलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली,माननीय आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या सौजन्याने, स्वामीनारायण ट्रस्टचे दिनेश थक्कर, रोटी डे ग्रुपचे तरुण नागडा, कच्छ युवक संघाचे केतन शहा गोपाल राठोड आणि नगरसेविका शालिनी वायले यांच्या सहकार्याने सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी प्रिन्सिपल माननीय रेखा ठाकूर, नगरसेविका विनानाताई जाधव, महात्मा फुले पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सौ. मंजुषा शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण डोंबिवली परिसरातील कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला सावित्रीच्या लेकींच्या हिरकणी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पीएसआय मंजूषा शेलार यांनी आर एस पी अधिकाऱ्यांनी देखील कोरोना काळात पोलीस प्रशासनालाच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाला मदत केली आहे आर एस पी युनिट चे कार्य खूप उल्लेखनीय आहे या शब्दात गौरव केला. सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी श्रीमती रेखा ठाकूर यांनी आर एस पी अधिकारी युनिटच्या सर्व अधिकाऱ्यांचे कोरोना योद्धा म्हणून मेडल देऊन गौरव केला . व कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्याचे कमांडर मणिलाल शिंपी यांचे कार्य शिक्षण विभागासाठी आणि शिक्षक बंधूंसाठी प्रेरणादायी आहे या शब्दात गौरव केला. हिरकणी गौरव पुरस्कारासाठी पोलीस विभाग., वाहतूक विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग, सफाई कामगार, खेळाडू, समाजसेविका, नगरसेविका, बँक महिला अधिकारी, कलाकार, अशा प्रत्येक विभागातील कर्तृत्ववान महिलांना हिरकणी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, यात शालिनी सुनील वायले (नगरसेविका), विना गणेश जाधव (नगरसेविका), मंजुषा शेलार (पीएसआय महात्मा फुले पोलिस स्टेशन), योगिता जाधव (पीएसआय डोंबिवली), सुनिता राजपूत (सहाय्यक वाहतूक पोलीस निरीक्षक कल्याण),रूपाली आळंदे(ए एस आय खडक पाडा), यांच्यासह पोलीस नाईक वर्षा राजगुरू, स्वाती मुळे ,लीना शिंदे, किरण पांचाळ , सरला मालुसरे, शिल्पा वाडकर (समाजसेविका), कोमल आवळे (कलाकार), प्रज्ञा अभंग ( आरटीओ कल्याण), डॉक्टर मनाली जैन, पत्रकार अशा माळी, सुजाता माने (मुख्याध्यापिका), इव्हा अथाविया(स्वधा फाउंडेशन), नेहा अग्रवाल (बँक मॅनेजर), सौ चारुलता पवार (बँक मॅनेजर), श्रावणी जाधव (खेळाडू), विभा जैन ( नंदादीप फाउंडेशन) पल्लवी राठोड ( शिक्षिका), ब्लॅक बेल्ट चॅम्पियन स्मिता नगन्नवार, व सफाई कामगार मीना साळवे, पुष्पा मडवी, कल्पना शिंदे, आरोग्य सेविका रिता परमार, विश्रांती गायकवाड, लक्ष्मी आवळे, अशा 56 सावित्रीच्या लेकींच्या हिरकणी गौरव पुरस्कार (सन्मानचिन्ह व सन्मान पत्र) व भेटवस्तू ,साडी देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रोटी डे ग्रुप,कच्छ युवक संघ, दिनेश ठक्कर, नितील चंदिया, गोपाल राठोड केतन शहा तरुण नागडा शशिकला शेट्टी यांचे सहकार्य लाभले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर एस पी कल्याण-डोंबिवली युनिटचे उपसमादेशक महादेव क्षीरसागर, अधिकारी रामदास भोकनळ, केशव मालुंजकर, जितेंद्र सोनवणे, शरद बोरसे, रितेश पाटील, विजय भामरे, नितीन पाटील, बन्सीलाल महाजन,गायत्री सपकाळे ,गजानन पाटील, बाळकृष्ण जगे, मुख्याध्यापिका मुस्कान हेमनानी, प्रभाशंकर शुक्ला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत किनगे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे, व सत्कारार्थी हिरकणी यांचे कमांडर मणिलाल शिंपी यांनी आभार मानले.