स्त्री आणि पुरुष हे समाजाचे प्रमुख आधारस्तंभ ; नंदा लोणकर

675

पुणे प्रतिनिधी

सामाजिक जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान भूषवणार्‍या स्त्री आजच्या स्थितीची, बदलत्या काळातल्या बदलत्या स्थानाची दखल घेणं समयोचित आहे. पण स्त्रियांना अजूनही दुय्यम स्थान दिलं जातं. म्हणूनच या समाजात समानतेचं बीज रुजणं खूप गरजेचं आहे. स्त्री आणि पुरुष समान असतात आणि दोघांनीही एकमेकांचा आदर करायला हवा. स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक असायला हवेत. यामुळे स्त्री आणि पुरुष हे या समाजाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत असे मत नंदा लोणकर यांनी ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्र व नगरसेविका नंदा लोणकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त कोंढवा येथील लोणकर हॉल मध्ये महिलांनी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, कपडे , पेंटिग्ज तसेच इतर प्रकारचे स्टॉल लावले होते. या स्टॉल ला महिलांनी तसेच इतर नागरिकांनी उत्सुफूर्त असा प्रतिसाद दिला होता.
महिलांचा आदर करण्याचे संस्कार घरातच देता येतील. पुरुषांनी आपल्या घरातल्या महिलांना सन्मानाने वागवायला हवं. महिलांना त्यांचे हक्क द्यायला हवेत. लहान वयातच महिलांचा आदर करायला शिकवलं, महिलांकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघायला, त्यांच्या मतांचा आदर करायला शिकवलं तर भविष्यात महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण कमी होऊ शकेल. महिला ही उपभोग्य वस्तू नाही तर एक माणूस आहे, तिलाही भावभावना आहेत याची जाणीव मुलांना करून देणं खूप आवश्यक आहे. आपल्या समाजात ही जाणीवच करून दिली जात नाही आणि याचे परिणाम पुढे दिसून येतात. मध्यंतरी घडलेल्या महिला अत्याचाराच्या काही दुर्दैवी घटना बघितल्या तर समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आपल्या लक्षात येईल. आधीच आपल्याला खूप उशीर झाला आहे. त्यामुळे आता थांबून चालणार नाही, असेही मत नगरसेविका नंदा लोणकर यांनी व्यक्त केले.
याप्रांगी एक्सेल डिग्नोस्टिकच्या मॅनेजर प्रतिभा चौधरी यांनी स्त्रियांच्या कॅन्सर विषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले व स्त्रियांच्या कॅन्सर विषयी असलेल्या शंकांचे निरसन केले . तर अ‍ॅडव्होकेट उर्मिला जाधव यांनी कायदेविषक मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच गौरी फुलावरे, जयश्री पुणेकर, रेणुका भिंताडे, अनुजा लोणकर यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले . याप्रसंगी महिलांनाअनुपमा सिलस
नायाब सय्यद, रेणुका सूर्यवंशी,वैशाली शिळीमकर,पामीला सिंग,हेमा देशमुख,आशा थामी
शकीला भाभी मुलाणी,आरती शर्मा,शहनाज चावला
परिनीता पाटील,प्रतिभा चौधरी,अनु चौधरी
अमिता भिलारे लोणकर यांना आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी वैशाली शिळीमकर यांनी योग आणि योगउपचार याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन करून महिलांनी रोज योगा करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी नंदा लोणकर, वैशाली शिळीमकर, रेणुका भिंताडे, जयश्री पुणेकर , गौरी फुलावरे, प्रतिभा चौधरी, भावना कराड-घरोडिया, ज्योती शहा, उर्मिला भालेराव, दीपाली भिंताडे,माया कामठे, हडपसर विधानसभा अध्यक्ष पुनम पाटील मायाताई ढोरे महिला अध्यक्ष काँग्रेस, युवती अध्यक्ष मनाली भिलारे, स्नेहल राऊत, मेधा हापसे, योगिता लोणकर सिफाली जगताप, शितल भिंताडे , शितल शिंदे उपाध्यक्ष हडपसर विधानसभा, उर्मिला जाधव, सविता टकले सुवर्णा घुले, मेघा बाबर, स्वाती चिटणीस आदी महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.तर कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन कवयत्री, लेखिका, निवेदिका अमिता भिलारे लोणकर यांनी केले