अखिल कोंढवा खुर्द शिवजयंती महोत्सव समितीचा आगळावेगळा समाजउपयोगी उपक्रम….

754

फेस मास्क, सनी टायझर, तांदूळ वाटपाचे आयोजन…

गणेश जाधव, प्रतिनिधी

अखिल कोंढवा खुर्द, शिवजयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते परंतु , यावर्षी समितीने सामाजिक भान राखत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता समितीच्यावतीने आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला गेला.

या उपक्रमांतर्गत अखिल कोंढवा खुर्द ,शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सागर लोणकर, उपाध्यक्ष अतुल जावळकर यांच्या अध्यक्षतेखाली फेस मास्क, सनी टायझर आणि प्रत्येकी पाच किलो तांदूळ वाटपाचे आयोजन करण्यात आले. यासाठी समाजातील इतर घटकांना वस्तूरुपी ,तांदूळरुपी मदतीचे आवाहन देखील समितीच्यावतीने करण्यात आले.समितीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत फेस मास्क, सनी टायझर,तांदूळ याचे समाजातील दुर्बल घटकांना वाटप केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी कोरोनाविषाणू प्रादुर्भाव होऊ नये यासंदर्भातील ब्रीद वाक्य तयार करण्याची स्पर्धा देखील आयोजित केली . प्रत्येकी पाच किलो तांदूळ समाजातील दुर्बल घटकांना वाटप करून एक सामाजिक संदेश देण्याचे कार्य समितीमार्फत केल्याचे पाहावयास मिळाले.

अखिल कोंढवा खुर्द, शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सागर लोणकर यांनी सांगितले की, यावर्षीचा शिवजयंती महोत्सव हा सामाजिक भान राखत समाजाला ज्या ज्या दुर्बल घटकांचा समाज विकासासाठी हातभार लागतो अशा लोकांना मदत करून शिवजयंती महोत्सव खऱ्या अर्थाने साजरी करण्याचा आनंद मिळाला असे मत देखील व्यक्त केले. यावेळी मा. आ. महादेव बाबर, अशोक लोणकर, सुदाम वांजळे, अमर पवळे, संतोष गोरड, महेश लोणकर, महेंद्र  गव्हाणे तसेच कोंढवा खुर्द ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.