*नव्या जुन्याची सांगड नवीन वर्ष*

465

अमिता भिलारे लोणकर
वर्षाचा शेवटचा दिवस सरता सरता मन उगाचच मागच्या आठवणीत रेंगाळतं, वर्षभरात काय काय झालं? सरत्या वर्षाला निरोप देताना मन उगाचच कातर होऊन जातं आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आनंदानं मन नाचतं, *प्रत्येकाच्या जीवनात काही चांगलं तर काही वाईट घडून गेलेलं असतं वर्षभरात पण बऱ्याचदा आपण काय गमावलं त्याचाच विचार करत असतो, त्यापेक्षा काय नवीन सापडलं हेच पाहायचं राहून जातं, कधीकधी नवीन ओळखी होतात, नवीन लोक जीवनात येतात, नवीन काहीतरी शिकायला मिळतं, नवीन जॉब ,नवीन घर ,नवीन गाडी असं बरंच काही तर,कधी कधी फार जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते त्याच्या आठवणीत डोळ्यांच्या कडा ओलावतात पण जन्म आहे तिथे मृत्यु निश्चितच मग निसर्गाचा नियमच त्यापुढे आपले काही चालत नाही, कायम सोबत अवती भोवती असणारी व्यक्ती अचानक पुढच्या प्रवासाला निघून जाते सहाजिकच आपल्याला हुरहूर लागतेच पण मग नवीन वर्षात त्यांने दिलेली शिकवण आत्मसात करून त्याला श्रद्धांजली व्हायची एवढेच करू शकतो आपण.
नवीन वर्ष येत असतो आपण म्हणतो, म्हणजेच नक्की तारीख, वार, एवढेच नाही तर भिंतीवरचं कॅलेंडर बदलतं, पण आपल्या अवतीभवतीची माणसं नाती बदलतात का? तर मुळीच नाही *नवीन वर्ष आलं तरी तारीख बदलते पण बाकी सगळं तेच असतं मग नवीन काय तर ,आपले विचार सरत्या वर्षात आपल्या कडून काय चूक झाली त्याची उजळणी करून त्या चुका सुधारायच्या, स्वतःसाठी तर जगतोच पण थोडं इतरांसाठी पण जगायचं*
*क्यूकी खुद के लिये*
*तो सब जीते है मगर*,
*थोडा दूसरों के लिए*
*जीकर देखो मजा*
*आता है जिने मे*
*नवीन वर्षात आपण खूप सारे संकल्प करतो पण,किती शेवट पर्यंत जातात? संकल्प करणं चांगला आहे पण त्यावर ठाम राहणं महत्त्वाचं असतं ,नवीन छंद जोपासणे आपल्या आवडीचं काम करणं त्यात स्वतःला झोकून देणं, नातेवाईकांची आवर्जून चौकशी करणं, एखाद्या गरजूला आपल्यापरीने मदत करणं, एखाद्या रोपाला काळजीपूर्वक वाढवणं, खूप काही आहे नवीन वर्षात करण्यासारखं ,एखाद्या निराश झालेल्या मनाला नवी उभारी देणारे चार शब्द बोलणे त्याला प्रोत्साहन देणारे आधाराचे, आपुलकीचे शब्द बोलणे, हे सुद्धा खूप मोठं काम करून जातं*
*शेवटी काय जुन्या-नव्या ची सांगड घालतच आपण पुढे पुढे जात असतो, जुन्या वर्षात आलेले भलेबुरे अनुभव सोबत घेऊन नव्या वर्षाला साद घालून येणारे क्षण आनंदाने जगूया ,जुन्या वर्षाच्या आठवणी आणि नवीन वर्षातले संकल्प मनात घेऊनच ,चला नव्या वर्षाचे स्वागत करूया आनंदाने ,उत्साहाने*

*भले बुरे जे घडून गेले*
*विसरून जाऊ सारे क्षणभर*
*जरा विसावू या वळणावर*

*©️®️अमिता भिलारे लोणकर*
*कोंढवा खुर्द*
*९६५७८५५४१६*