रस्तारुंदीकरणासाठी स्वत:हून हटविले ऑफिसचे बांधकाम

1157

कोंढवा प्रतिनिधी,

कोंढवा ते मंतरवाडी रस्त्यावरील उंड्री येथील मुख्य चौकातील असलेले माजी सरपंच सुभाष टकले यांनी त्याचे ऑफिस स्वत:हून हटविले असून एक नवा आदर्श पायंडा पाडला आहे. तसेच रस्तारुंदीकरणात अडथळा ठरणारे इतरही नागरिकांनी आपले बांधकाम काढून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जनसेवक राजेंद्र भिंताडे आणि सुभाष टकले यांनी केले आहे.

कोंढवा ते मंतरवाडी हा रस्ता बाह्यवळण म्हणून ओळखला जातो. यामुळे पुणे शहराबाहेर जड वाहने याच रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात यामुळे येथील वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. उंड्री चौकात रस्ता अरुंद असून आणि रस्ता रुंदीकरणाचे काम रखडल्याने येथे वारंवार अपघात असून येथे अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहे. यामुळे यावर उपाय म्हणजे येथील रस्ता रुंदीकरण महत्वाचे असल्याने मा. सरपंच सुभाष टकले आणि राजेंद्र भिंताडे यांनी उंड्री चौकातील रस्ता रुंदीकरणात येणारे बांधकामे नागरिकांनी स्वतःहून हलवावेत आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन भिंताडे यांनी केले आहे. याप्रसंगी सचिन पुणेकर, मयूर टकले उपविभागीय अभियंता हवेली अभियंते चंद्रशेखर कुलकर्णी आणि अजय देशपांडे उपस्थित होते.