प्रवासासाठी बनावट इ – पास बनवणारा आरोपी पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात

554

पुणे प्रतिनिधी,

पुणे शहरात  Covid-19Mhpolice.gov.in या वेबसाईटवरुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी नागरिकांना बनावट इ-पास तयार करून देउन शासनाची फसवणूक करणाऱ्याचे पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग व दरोडा विरोधी पथकाने हडपसर परिसरात तरूणाला अटक करण्यात आली आहे. धनाजी मुरलीधर गंगनमले (वय 29, रा. भेकराईनगर, फुरसुंगी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे लॉकडाउन करण्यात आला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसह महत्वाच्या कामांमध्ये प्रवास करताना अडथळा निर्माण होउ नये, यासाठी शासनाने इ-पास बंधनकारक केला आहे. परराज्यासह दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पोलिसांच्या वेबसाईटवर फॉर्म भरून इ-पास मिळविल्यानंतरच प्रवासाला परवानगी देण्यात येत आहे दरम्यान, संबंधित सेवेचाही गैरफायदा घेउन स्वतःच्या आर्थिंक हितासाठी तरूण हडपसरमध्ये नागरिकांना बनावट इ-पास वितरित करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी भेकराईनगरमधील विश्वसृष्टी सोसायटीतील तरूणाच्या घरी छापा टाकला. त्यावेळी धनाजी गंगनमले लॅपटॉपवर बनावट इ-पास बनवून नागरिकांना विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई.पोलीस आयुक्त , पुणे शहर. अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त , डॉ . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा , पुणे शहर , अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे पुणे श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ पुणे सुरेन्द्रनाथ देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली शिल्पा चव्हाण , पोलीस निरीक्षक , दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , पुणे शहर व अतिरिक्त कार्यभार सामाजिक सुरक्षा विभाग , पुणे शहर , सहा पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर , पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके , पोना इरफान पठाण , मपोना निलम शिंदे , पोशि पुष्पेंद्र चव्हाण , पोना मॅगी जाधव , पोना गणेश पाटोळे , पोना प्रमोद मोहिते , व पोना गणेश ढगे यांच्या पथकाने केली आहे .