महाराष्ट्र दिनानिमित्त उंड्रीतील शाळेत वृक्षारोपण

458

कोंढवा प्रतिनिधी:

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत असून आपल्याला नैसर्गिक ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी वृक्ष हेच साधन असून जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे मत जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून उंड्री येथील जिल्हापरिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करताना व्यक्य केले.

वृक्ष हे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देत असून प्रत्येक घरातील प्रति व्यक्ती एक झाड लावल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळेल , पर्यायाने वातावरणातील उष्णता कमी होऊन पर्यावरणाची हानी कमी होईल आणि नागरिकांना नैसर्गिक ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल. त्यामुळे प्रत्येकाने जिथे मोकळी जागा उपलब्ध असेल तिथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे असेही भिंताडे यावेळो म्हणाले.याप्रसंगी माजी सरपंच सुभाष टकले,दादा कड,कैलास पुणेकर, भाजपा अध्यक्ष अविनाश टकले, ओबीसी अध्यक्ष ओंकार होले, ग्रा.प सदस्य अक्षय फुलावरे, कपिल आबनावे व उंडरी ग्रामस्थ उपस्थित होते.