आळंदी रुग्णालयाने रेमडीसीवीर वापराची माहिती जाहीर करावी :- येळवंडे

392

आळंदी ग्रामीण रुग्णालयास भाजपची मागणी

अर्जुन मेदनकर आळंदी : आळंदी ग्रामीण रुग्णालय कोवीड १९ अंतर्गत रुग्णासाठी कार्यरत करण्यात आले असून कोरोणाच्या महामारीने बाधीत रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयास शासनाकडून मार्च, एप्रिल महिन्यात रेमडीसीवीर इंजेक्शन्स पुरविण्यात आले. या रेमडीसीवीर वापरात भेदभाव झाल्याचे पार्श्वभूमीवर आळंदी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आळंदी ग्रामीण रुग्णालयाने इंजेक्शन वापरचा अहवाल देवून माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. अशी माहिती आळंदी शहर भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी दिली.

या संदर्भात आळंदी शहर भाजपाचे वतीने आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी.जी. जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी भाजपच्या आध्यात्मिक विकास आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय घुंडरे, आळंदी शहर भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, संत ज्ञनेश्वर महाराज यांचे सेवक राजाभाऊ रंधवे चोपदर, उपाध्यक्ष बंडुनाना काळे, ज्ञानेश्वर बनसोडे आदि उपस्थित होते.

आळंदी ग्रामीण रुग्णालयास रेमडीसीवीर इंजेक्शन किती मिळाली, कोणत्या रुग्णास किती दिली, त्यांचे कोरोना अहवाल, डॉक्टरांनी रेमडीसीवीर इंजेक्शन्सची मागणी केल्याचा प्रस्ताव देण्याची मागणी केली असल्याए त्यांनी सांगितले. आळंदी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. जाधव यांच्या कडे लेखी निवेदांनातून करण्यात आली आहे.

आळंदी ग्रामीण रुग्णालयातून रेमडीसीवीर इंजेक्शन्सचे वाटपट आगर वापरात वितरण प्रसंगी सत्ताधारी राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी यांच्या वशीले बाजीने वाटप झाल्याचे समजते . यामुळे कोविड बाधीत रुग्णांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे या पुढे रेमडीसीवीर इंजेक्शन आणि लसीकरण करताना वशीलेबाजी तसेच रुग्णांचे आरोग्याची काळजी घेताना कोणताही भेदभाव होवू नये म्हणून निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरण करताना आरोग्य विभागातील तसेच इतर कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी नम्रतापूर्वक आरोग्य सेवा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यात सुधारणा न झाल्याचे वरिष्ठ स्तरावर तक्रार करुन कारवाईची मागणी केली जाईल असा इशारा आळंदी शहर भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी दिला आहे. या संदर्भात आवश्यक ती माहिती लवकरच दिली जाईल अशी ग्वाही आरोग्य सेवा प्रशासनाने दिली असल्याचे येळवंडे यांनी सांगितले