जागतिक परिचरिका दिनानिमित्त उंड्रीत परिचारिकांचा सन्मान

652

कोंढवा प्रतिनिधी

नार्सिंग चे मेडिकल क्षेत्रातील योगदान हे अतुलनीय आहे आणि प्रशंसनिय आहे. परिचरिकांमुळे रुग्णांची वेळोवेळी निगा राखली जाते. त्यांची कामगिरी ही कौतुकास्पद आहे, या सेवेसाठी परिचारिकांना नेहमी प्रत्येकाच्या आठवणीत जपून ठेवल्या जाईल आणि त्यांना समाजात प्रत्येकाने चांगल्या प्रकारे सन्मानित वागणूक द्यावी. कारण हॉस्पिटलमध्ये असताना आपल्या आरोग्याची काळजी परिचारिका च घेत असतात, अश्या या सर्व परिचारिकांना जागतिक परिचारिका दिवसाच्या शुभेच्छा देत राजेंद्र भिंताडे यांनी उंड्री येथील जि .प.शाळेत लसीकरण सुरु असलेल्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावीत असलेल्या परिचारिकांचा पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देत त्यांचा सन्मान केला.

आजही कोरोनासारख्या संकटकाळात देशातील नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आपले जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत,
प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला असलेल्या मेडिकल स्टाफ चा आदर केला पाहिजे कारण ते सर्व आपल्या साठी लढत आहेत, देशासाठी लढत आहेत.
ज्या आपला परिवार सोडून देशातील रुग्णांची सेवा करण्यासाठी मृत्यूच्या तोंडात सुध्दा जायला भीत नाही आहेत. अश्या या कोरोना वॉरियर्स म्हणजेच परिचारिका डॉकटर आणि मेडिकल स्टॅफ यांना आम्ही मानाचा मुजरा करत आहोत असेही राजेंद्र भिंताडे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी दत्तोबा बांदल, वसंत कड, दादा कड, अविनाश टकले , ओंकार होले, राजेंद्र कड, संतोष गोरड आदी उपस्थित होते.