नगरसेवक साईनाथ बाबर यांनी कोंढव्यातील उड्डाणपुलाला स्वखर्चाने लावला नामफलक

980

कोंढवा प्रतिनिधी,

महापालिकेच्या अनागोंदी कारभार आणि वारंवार मागणी करूनही लुल्लानगर येथील उड्डाणपुलाला नामफलक लावत नसल्याने
कोंढवा येथील लुलानगर उड्डाणपुलाला नगरसेवक साईनाथ बाबर यांनी स्वखर्चाणे आज नामफलक बसविला यामुळे त्यांचे कोंढवा तसेच पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
वास्तविक उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नामकरण करण्यात आले होते. पण पालिकेने याठिकाणी नामफलक बसविला नाही. यांनतर नगरसेवक साईनाथ बाबर यांनी पालिकेला अनेकवेळा कळवूनही फलक बसविला नव्हता. यामुळे बाबर यांनी स्वतः च्या स्वखर्चातून नामफलक बसविला आहे.
यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयन्त केला असता तो झाला नाही.