ब्रेकिंग: पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

772

दिवसभरात नवे ९७३ कोरोनाबाधित!

पुणे शहरात आज नव्याने ९७३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६४ हजार ०७६ इतकी झाली आहे.

■ नवे रुग्ण : ९७३
■ डिस्चार्ज : २४९६
■ चाचण्या : ११,६७६

दिवसभरात २ हजार ४९६ रुग्णांना डिस्चार्ज !

शहरातील २ हजार ४९६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ४२ हजार ६६९ झाली आहे. 

दिवसभरात ११ हजार ६७६ टेस्ट !

पुणे शहरात आज एकाच दिवसात ११ हजार ६७६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख १६ हजार इतकी झाली आहे.

नव्याने ४१ मृत्युंची नोंद !

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ९२८ इतकी झाली आहे.

गंभीर कोरोनाबाधितांची संख्या १,३१५ !

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या १३ हजार ४७९ रुग्णांपैकी १,३१५ रुग्ण गंभीर तर ४,२७९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.